Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Suruvat Eka Suruvatichi By Prafulla Kadam
Rs. 0.00
तसं पाहिलं तर हे पुस्तक नाही, एक प्रयोग आहे. या प्रयोगासाठी प्रयोगशाळा कशी सिद्ध केली गेली याचं ते आत्मचरित्रात्मक निवेदन आहे. बहुतेक आत्मचरित्रांमध्ये ‘आत्म’ म्हणजे ‘मी’ महत्त्वाची भूमिका बजावत असतो. परंतु प्रफुल्ल कदम यांच्या आत्मचरित्रात मुख्य भूमिका आहे ‘वेडीबाभळीची’. त्या नायिकेचा म्हणजे वेडयाबाभळीचा परिसर आहे ग्रामीण महाराष्ट्राचा. मात्र प्रयोग आहे जागतिक स्तरावर परिणाम घडविणारा. या आत्मचरित्राला उद्दिष्ट आहे ऊर्जाक्रांतीचे - जी जलक्रांती व कृषीक्रांती समवेतच साध्य होऊ शकते... ...पूर्णपणे प्रतिकूल वातावरणातही प्रयोग करण्यासाठी लागते दुर्दम्य जिद्द. जिद्दीला भांडवल लागत नाही. उद्दिष्ट निश्चित असेल, विचार पक्का असेल आणि जिद्द असेल तर सर्व अडचणींवर मात करता येते. अगदी नकारात्मक विचार करणार्‍यांचा विरोधही मोडून काढता येतो आणि मतलबी मंडळींचे खेळही थोपविता येतात. खरं म्हणजे महाराष्ट्रात हजारो तरुण असे आहेत की ज्यांना काहीतरी करायचं आहे, परंतु दिशा नाही, कार्यक्रम नाही वा मार्गदर्शन नाही. त्यांना हे पुस्तक एक ‘गाईड’ ठरेल. -कुमार केतकर

Click here to be notified by email when this product becomes available.

Translation missing: en.general.search.loading