Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Himalyavasi Guruchya Yogi Shishyache Atmakahta हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन By Sri M
Rs. 449.00Rs. 499.00
दक्षिण भारतात केरळच्या देवभूमीत मुस्लिम समाजात जन्माला आलेल्या श्री. एम. यांनी श्रद्धेने उत्तुंग हिमालयापर्यंत प्रवास केला. या दीर्घ प्रवासात गुरूंच्या मार्गदर्शनाने आध्यात्मिक, धार्मिक ज्ञान त्यांनी ग्रहण केले. यादरम्यान त्यांना आलेले वेगळे, अद्भुत अनुभव, भेटलेली अलौकिक माणसे यांचे वर्णन त्यांनी ‘हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन’ या आत्मवृत्तात केले आहे.

अनेक असामान्य गोष्टींनी भरलेली ही सफर वाचकांना वेगळे विचार करायला लावते. समर्पण भावनेने जीवन जगणाऱ्या एका युवकाचा हा अध्यात्मिक प्रवास आहे. एका बुद्धिमान आणि शक्तिशाली गुरूंशी त्याची भेट होते. हाच युवक पुढे योगी म्हणून प्रसिद्ध होतो. तेच योगी श्री. एम. यांच्या जीवनप्रवासाचा श्री. वि. पटवर्धन यांनी केलेला हा अनुवाद आहे. उपनिषदांच तत्वज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव यांमधून प्राप्त झालेलं सखोल आकलन या प्रवासातून प्रत्ययाला येतं.

श्री. एम. यांचे गुरुजी म्हणजे बाबाजी. 'आपल्या कृतीमध्ये नेमकेपणा व साधेपणा असू दे. बाह्य फापटपसारा जराही असता कामा नये. या जगामध्ये एखाद्या सर्वसामान्य माणसाप्रमाणेच वावर. महानतेला कधीही जाहिरातीची गरज नसते. जे लोक संपर्कात येतात त्यांना ती आपोआपच जाणवू लागते.' असा उपदेश बाबाजी करतात.

Click here to be notified by email when this product becomes available.

Categories:
Translation missing: en.general.search.loading