Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Guns germs and steel by Jared Diamond
Rs. 630.00Rs. 700.00

Shrimadbhagavat Gitarahasya  by bal Gangadhar tilak श्रीमद्भगवद्वीतारहस्य

गीतारहस्य हा ग्रंथ लो. टिळकांनी मंडाले मुक्कामी कारागृहवासांत लिहिला ही गोष्ट सर्वांस विदितच
आहे. सोमवार ता. ८ जून १९१४ रोजी लोकमान्यांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली. तेथून पुण्यास परत आल्यावर कित्येक आठवडे वाट पाहूनही मंडालेचा तुरुंग सोडण्यापूर्वी, तेथील सर्व सामानासह तुरुंगावरील अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केलेल्या गीतारहस्याच्या हस्तलिखित वह्या सरकारकडून लवकर परत मिळण्याचे चिन्ह दिसेना. जसजसे दिवस लोटू लागले तसतसे सरकारच्या हेतूविषयी लोक अधिकाधिक साशंक होऊ लागले. काहीजणांनी अखेर स्पष्ट बोलून दाखविले की, “सरकारचे लक्षण काही ठीक दिसत नाही, वह्या परत न करण्याचा इरादा दिसतो." कोणाच्या तोंडून असे शब्द कानांवर पडले की लोकमान्य म्हणत, "भिण्याचे काहीएक कारण नाही. वह्या सरकारच्या कबजांत असल्या तरी, ग्रंथ माझ्या डोक्यात आहे. फुरसतीच्या वेळी सिंहगडावर बसून जसाच्या तसा लिहून काढीन." ही आत्मविश्वासाची तेजस्वी भाषा उतारवयांतील म्हणजे अगदी साठीच्या घरांत आलेल्या वयोवृद्ध गृहस्थाची आहे आणि ग्रंथ किरकोळ नसून गहन तत्त्वज्ञानविषयक असा आहे, एवढ्या गोष्टी ध्यानात घेतल्या की, लोकमान्यांच्या प्रवृत्तिपर प्रयत्नवादाची यथार्थ कल्पना तात्काळ येते. सुदैवाने पुढे लवकरच सरकारकडून सर्व वह्या सुरक्षित मिळाल्या
व लोकमान्यांच्या हयातीत त्यांनी या ग्रंथाच्या तीन आवृत्त्या काढल्या.
... प्रस्तावनेतून

Categories:
Translation missing: en.general.search.loading