इसवीसन पूर्व हजारो वर्षांपूर्वी भारतात जन्मलेल्या ३२ चतुरंग (बुद्धिबळ) दलांची, पटावरील ६४ घरांच्या रणमैदानावरील जगन्मान्य ग्रँडमास्टरांतील घनघोर युद्धाची उत्तरोत्तर उत्कंठा वाढवणाया रणसंग्रामाचे मार्गदर्शक मार्मिक ऐंशी छोटेमोठे सटीप चाली व आकृत्यांसह असणारे डाव या पुस्तकात पाहाल. त्यापैंकी दोन नमुनेदार उदाहरणे पुढे दिली आहेत. (एक) ‘बाल बुद्धिबळपटूचा प्रज्ञादीपक डाव’ क्र. ४४ पाहा पॉल मॉर्फी (१८३७ ते १८८४) हा अत्यंत चतुर आणि समर्थ असा जागतिक किर्तीचा पहिला बाल बुद्धिबळपटू ग्रँ. मा. आहे. त्याने वयाच्या केवळ तेराव्या वर्षी, फक्त चौदा चालीत जिंकलेला आकर्षक असा हा डाव क्र. ४४ पाहा. (दोन) जगन्मान्य ग्रँ. मा. आलेखाईन ‘डोळे बांधून खेळला नि डाव जिंकला’ तो डाव क्र. ४७ पाहा. त्यामध्ये १४ व्या चालीनंतरची , आ. क्र. ४७ ची स्थिती पाहा. ‘सारखे सैन्यदल आहे दोघांच्याकडे; कच्चा दुवा निखळला की त्याचा डाव कोसळला.’ नेमका हा कच्चा दुवा ग्रँ. मा. आलेखाईनने मन:चक्षूंनी ओळखून, केवळ सोळाव्या आक्रमक बलिदानी चालीने जिंकलेला डाव अविस्मरणीय आहे. . स्थलसंकोचामुळे इतर सर्वच डावांचे तंत्र नि मंत्र येथे देणे शक्य होणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या डावांच्या शेवटी दिलेले त्या त्या डावांचे विविध शीर्षक व मार्मिक मथळे वाचून, ते ते डाव प्रत्यक्ष पटावरती खेळून, त्यातील चालीप्रतिचालींचे सटीप वर्णन वाचून, डोळसपणे त्या त्या डावांचे वर्म नि मर्म जाणून घेताना खेळ शिकणाNया खेळाडूंना नक्कीच योग्य ते मार्गदर्शन या पुस्तकाचा अभ्यास करताना नक्कीच होईल यात काही शंका नाही. तुम्ही बुद्धिबळ खेळातले नवशिके असा किंवा नियमीत कसबी खेळाडू असा; हे पुस्तक मार्गदर्शक म्हणून तुम्हाला नित्य संग्रही ठेवावेसे वाटेल!