संसार घरच इतका अवघड आहे का? माणसाला नेमकं काय हवय? संपूर्ण आयुष्य संगीतमय करता येणार नाही का? एखाद्या मैफिलीसारख रंगवता येणार नाही का? आपल्या जल्मापूर्वी हे जग होतच. आपण मेल्यानंतरही जगाचा कारभार तसाच चालू राहणार आहे. ह्या अवाढव्य रंगमंचावर आपली एंट्री मध्येच केव्हातरी होते आणि एक्झिट हि. हे नाटक किती वर्षाचं, ते माहित नाही चाळीसी, पन्नाशी, साठी, सत्तरी.... सगळं अज्ञात. धडधाकट भूमिका मिळणार कि जन्मांधळेपणा, अपंगत्व, बुद्धीच वरदान लाभणार, कि मतिमंद? भूमिकाही माहीत नाही. तरी माणसाचा गर्व,दंभ,लालसा.... किती सांगाव? कृष्णानं बासरीसहित आपल्याला चढवलं; पण त्या सहा छिद्रातून संगीत जन्माला येत नाही. स्वतःला काहीहि कमी नाही. स्वास्थाला धक्का लागलेला नाही. तरी माणस संसार सजवू शकत नाहीत.