Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Yogdeepika By B K S Iyengar
Rs. 0.00
योगसाधकांसाठी हे पुस्तक म्हणजे योगविद्येची जणू गीताच !
१९३६पासून बी.के.एस. अय्यंगार यांनी जनसामान्यांना योगविद्येचे धडे दिले. जगभर प्रवास करून त्यांनी प्रात्यक्षिकांद्वारे योगविद्येचा विविध देशात प्रसार केला. या पुस्तकात त्यांनी ‘योग’ म्हणजे काय, त्या मागचं तत्त्वज्ञान कोणतं व त्याची व्याप्ती किती याविषयी समर्पक चर्चा केली आहे.
पुस्तकात आसनांविषयी सखोल विवेचन करून त्या त्या आसनांची छायाचित्रं दिली आहेत. एवूâण २०० आसनं आणि बंध व १४ श्वसनाचे प्रकार (प्राणायाम) विस्तृतपणे दिले आहेत. पुस्तकात त्या त्या जागी दिलेल्या ६०० छायाचित्रांच्या आधारे तुम्ही कोणतंही आसन शिक्षकाच्या मदतीशिवाय बिनधोक करू शकता.
याशिवाय योग, नाडी, चक्र आणि कुंडलिनी या योगशास्त्रातील महत्त्वाच्या संज्ञांच्या व्याख्या देऊन त्यावर थोडक्यात भाष्यही केलं आहे. परिशिष्टामध्ये विशिष्ट आजारांवर प्रभावी ठरणार्‍या आसनांची यादीच दिली आहे. तसेच योगविद्या आत्मसात करण्यामध्ये विशेष रुची असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ३०० आठवड्यांचा एक प्रदीर्घ कोर्सच आखून दिला आहे. या कोर्सची विभागणी तीन भागांमध्ये केली आहे.
प्रारंभी सोप्या आसनांपासून सुरुवात करत थोडी अवघड आसनं आणि नंतर कठीण आसनं टप्प्याटप्प्याने कशी करावीत याचं उत्कृष्ट मार्गदर्शन करणारं हे पुस्तक... योगदीपिका !

Click here to be notified by email when this product becomes available.

Translation missing: en.general.search.loading