Skip to product information
1 of 1

राजकीय विचार आणि विचारवंत by V.G.NADEDKAR

राजकीय विचार आणि विचारवंत by V.G.NADEDKAR

Regular price Rs. 450.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 450.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language
मानवी संघटनांच्या विकासात राजकीय समाज ही एक महत्त्वाची उत्क्रांत अवस्था मानली जाते. जाणीव व जागरूकता ही तिची वैशिष्ट्ये आहेत. समाजनिर्मितीचा मूळ हेतू, संस्थांचे संघटन, त्यांचे आंतरसंबंध तसेच व्यक्ती व संस्थांचे नैसर्गिक व न्याय्य नाते ह्यांविषयी एक तर्कसंगत चौकट निर्माण करण्याचा आणि त्या आधारे समाजातील बदल सुसंगत, सातत्यपूर्ण व सकारात्मक करण्याचा प्रयत्न तत्त्वज्ञांनी केलेला आहे.
सुरुवातीपासूनच आदर्शवाद व व्यवहारवाद ह्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न राजकीय तत्त्वज्ञांनी केलेला दिसून येतो. प्लेटोच्या आदर्शवादाबरोबर ऍरिस्टॉटलचा व्यवहारवाद हा नैसर्गिक अपघात नसून ऐतिहासिक अनिवार्यता आहे. राजकीय तत्त्वज्ञांनी देशकालपरत्वे व्यक्ती व राज्यसंस्थेचे नाते सघन व सजग करण्याचा मार्ग शोधलेला आहे. सामाजिक करार, वर्गसंघर्ष, उदारव्यक्तिवाद, व्यक्तीचे सबलीकरण हे सर्व गतिमान समतोल निर्मिण्याचे बहुविध मार्ग आहेत. यांचा मागोवा विकसनशील देशांच्या संदर्भातही राज्यशास्त्राच्या विद्यार्थी - वाचकांना उपयुक्त होईल. ‘राजकीय विचार आणि विचारवंत’ ह्यामध्ये अशी दिशा जाणीवपूर्वक देण्याचा हेतू साधलेला आहे.
View full details