Skip to product information
1 of 1

Aamhi Ghaamache Dhani | आम्ही घामाचे धनी Author: Uddhav Kanade |उद्धव कानडे

Aamhi Ghaamache Dhani | आम्ही घामाचे धनी Author: Uddhav Kanade |उद्धव कानडे

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

मराठी काव्यजगतामध्ये स्वतःची स्वतंत्र अशी नाममुद्रा उमटविणारे कवी म्हणून उद्धव कानडे ओळखले जातात . त्यांच्या कवितेने नेहमीच श्रमाचे मोल आणि घामाचा अर्थ सांगितला आहे .

या संग्रहात तर त्यांची कविता वेदनांचा मोहोळ होऊनच येते . हे मोहोळ वाचकांना दंश तर करतेच पण अंतर्मुख करते . व्यवस्थेला प्रश्न विचारायला लागते . 

ज्या श्रमिकांच्या श्रमावर जग उभे राहते त्या श्रमिकांनाच पायदळी का तुडवले जाते हा तो कळीचा प्रश्न होय . या प्रश्नाच्या शोधातून मग वेदनांचा गाव साकार होत जातो . या गावाच्या केंद्रस्थानी आहे आई आणि आईचेच दुसरे रूप असणारी भूमी .

आईचे श्रम वेदना अन अजिंक्य आत्मविश्वास ठायीठायी व्यक्त होत जातो . 

भूमीचे उदारपण आणि आज जागतिकीकरणामध्ये तिला आलेली अवकळाही व्यक्त होत जाते . हे सारे साकार करणारी त्यांची  एकएक कविता मग घामाचे एकएक सुक्त बनत जाते .

ही सारी सुफ्ते जीवनाच्या पुन पुनर्मांडणीचे भान देऊन जातात . त्यांची एकएक कविता व्यवस्थेवर केलेला वारच असतो . हा वार अधिक धारधार होतो तो तिच्यातील अतंर्गत लयीमुळे . त्यामुळेच ती गेय आणि कमालीची उत्कट होत जाते 

View full details