Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Aani Vidyechya Bailala By Sanjeev Latkar
Rs. 135.00Rs. 150.00

'लिफ्टमन असो वा मोटार कंपनीचा डेप्युटी जनरल मॅनेजर; केवळ वयानं वाढलेला मंदबुध्दीचा तरुण असो वा आईपण जपू पाहणारी घटस्फोटिता; स्पर्धेच्या युगात सारं काही पणाला लावू पाहणारी शाळकरी मुलं असोत वा महानिर्वाणाच्या वाटेवरचा प्रवासी... हरत-हेची माणसं आपल्या सभोवती असतात. आपापल्या परीनं जगत असतात. संजीव लाटकर यांना या माणसांबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल किती विलक्षण कुतूहल असतं, ते त्यांच्या कथेतून सहज जाणवतं. लाटकरांची कथा गेल्या चार-दोन वर्षांतलीच; पण ती नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते. आकार लघुकथेचा असो वा कादंबरीचा; बदलत्या काळाचे, बदलत्या समाजजीवनाचे चित्रण ती समर्थपणे करते. तिच्यातील विविधता, तिची मांडणी लक्षवेधक आहे; मराठी रसिकास दखल घ्यावयास लावणारी आहे; अपेक्षा वाढविणारीही आहे. 

Translation missing: en.general.search.loading