Aanibaniche Akhyan by Gyan Prakash आणीबाणीचे आख्यान इंदिरा गांधी आणि लोकशाहीची सत्त्वपरीक्षा - ज्ञान प्रकाश
Aanibaniche Akhyan by Gyan Prakash आणीबाणीचे आख्यान इंदिरा गांधी आणि लोकशाहीची सत्त्वपरीक्षा - ज्ञान प्रकाश
Couldn't load pickup availability
भारतीय लोकशाहीची मुळे आणि तिचे भवितव्य यांचे सखोल विश्लेषण
जग पुन्हा एकदा हुकूमशाही राजवटींच्या उद्रेकास सामोरे जात असताना, ज्ञान प्रकाश यांचे ‘आणीबाणीचे आख्यान’ हे पुस्तक इंदिरा गांधींच्या १९७५ ते १९७७ पर्यंतच्या आणीबाणीच्या कालखंडाचा मागोवा घेते. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाच्या घडामोडींपासून विश्लेषणाची सुरुवात करत सर्वसमावेशक ऐतिहासिक लेखाजोखा मांडते. सत्तेला चिकटून राहण्याच्या तत्कालीन पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षेपोटी आणीबाणी लादण्यात आली, या सर्वसामान्य समजाला हे पुस्तक आव्हान देते. किंबहुना आणीबाणी ही केवळ इंदिराजींच्या कृतींचा परिणाम असण्याऐवजी भारताच्या लोकशाही राजकारणात जी गुंतागुंत निर्माण झाली होती त्याचा परिपाक होती आणि हे भारतीय इतिहासातील एक निर्णायक वळण होते, असा नावीन्यपूर्ण व साधार युक्तिवाद हे पुस्तक करते.
Share
