Skip to product information
1 of 1

Aapala Vajan Aapalya Haati DR MALATI KARVARAKAR आपलं वजन आपल्या हाती डॉ. मालती कारवारकर

Aapala Vajan Aapalya Haati DR MALATI KARVARAKAR आपलं वजन आपल्या हाती डॉ. मालती कारवारकर

Regular price Rs. 153.00
Regular price Rs. 170.00 Sale price Rs. 153.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Condition
Language

आपलं वजन आपल्या हाती

डॉमालती कारवारकर

 

एखादी वजनदार वस्तू हलवायची असेलतर त्यासाठी एकापेक्षा अधिक माणसांची मदत घ्यावी लागतेहे सामान्य ज्ञान शरीराच्या वजनाच्या बाबतीतही लागू पडतंपण असा विचार न करता या प्रश्‍नाकडे पाहताना केवळ दोनच बाबींचा विचार केला जातोएक म्हणजे कॅलरीज मोजून खाणं आणि मर्यादेपलीकडे व्यायाम करणंयामुळे ठेवल्या ठिकाणाहून तसूभरही न हलता एकाच जागी अडकून पडलेल्या वजनदार वस्तूप्रमाणे शरीराच्या वजनाचा प्रश्‍न वर्षानुवर्षं तसाच रेंगाळत राहिला आहेआता तर हा प्रश्‍न वैद्यकतज्ज्ञांच्या उपायांनाही दाद देईनासा झाला आहे.

हे असं होण्याचं कारण म्हणजे ‘माणूस’ हा प्रकृतिधर्म घेऊनच जन्माला येतोयाचा माणसाला स्वतःलाच विसर पडला आहेवजनाच्या प्रश्‍नाच्या मुळाशी जायचं ठरवलंतर आजवर दुर्लक्षित राहिलेल्या अनेक कंगोर्‍यांचं महत्त्व लक्षात येईलहे लक्षात आलंतरच या वजन हलवण्याच्या मार्गातले खाचखळगे दृष्टिपथात येतीलअसा दृष्टिकोन वापरलातरच माणसाच्या प्रयत्नांना यश येईल आणि हेही उमजेलकी आपलं वजन राखणं आपल्याच हातात आहे.

अशा या आजवर न दिसलेल्या खाचखळग्यांचा सांगोपांग विचार प्रस्तुत पुस्तकात केला आहेत्यामुळे नेहमीचा सरधोपट मार्ग सोडून योग्य तो दृष्टिकोन वापरल्यास माणसाला प्रथम आरोग्य आणि नंतर योग्य वजन मिळवण्यात आणि ते राखण्यात यश येईल.

वजनाच्या बाबतीत आहारशास्त्राचा मंत्र हेच सांगतोकी ‘आरोग्य आणि योग्य वजन हातात हात घालूनच येतात.’

Reviews
0.0
0 reviews
5
0
4
0
3
0
2
0
1
0
Click to review
No reviews yet, lead the way and share your thoughts
View full details