1
/
of
1
Aayushy Satkarni Lava by h.v. bhave
Aayushy Satkarni Lava by h.v. bhave
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. त्याचा थोडक्यात अर्थ असा "शास्त्रे व ज्ञान तर अनंत आणि अपार आहेत. परंतु मानवाच्या आयुष्याला ठराविक मर्यादा आहेत. हे मानवी आयुष्यही पदोपदी विविध संकटांनी भरलेले आहे." हंस या पक्ष्याला दूध व पाणी एकत्र करून दिले तरी त्यातील दूधच काढून पिण्याची युक्ती माहीत असते, अशी एक कविकल्पना आहे. माणसाने हंसाप्रमाणे जगातील सार तेवढे घ्यावे. आणि असार तितके सर्व टाकून द्यावे. तरच त्याला त्याचे मर्यादीत आयुष्य सत्कारणी लावता येईल. हा छोटा ग्रंथ असाच सारमय आहे. मोठ्या प्रयत्नाने मिळालेला मानवी जन्म सत्कारणी कसा लावायचा ? याचे दिशादर्शन या पुस्तकातून होऊ शकेल, सर्वानीच आणि विशेषत: विद्यार्थ्यांनी हे पुस्तक पुनः पुन्हा वाचावे आणि आत्मसात करावे असेच आहे. या पुस्तकात दिलेली तत्त्वे व नियम पाळल्यास कोणाचेही आयुष्य सार्थकी लागणार आहे.
हा ग्रथ पूर्णपर्णे स्वतत्र नाही. "Economy of Human Life" या ग्रंथाचा मुख्य आधार हे पुस्तक लिहिण्यास घेतला आहे. पण मूळ ग्रंथ ज्या कोणी इंग्रज लेखकाने लिहिला त्याने मुखपृष्ठावरच लेखकाचे नाव "written by an ancient Brahmin'" असे लिहिले आहे. म्हणजे मूळ इंग्रजी पुस्तकच भारतीय संस्कृतीवर आधारलेले आहे. त्यामुळे या पुस्तकाचा भावानुवाद करताना भारतीय संस्कृतीचा अभ्यास उपयोगी पडला आहे. या मूळ इंग्रजी ग्रंथाची जगात अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत.
Share
