Adhyatma Upnishad | अध्यात्म उपनिषद by AUTHOR :- Osho
Adhyatma Upnishad | अध्यात्म उपनिषद by AUTHOR :- Osho
हे उपनिषद म्हणजे अध्यात्माचा प्रत्यक्ष साक्षात्कार आहे. यात सिद्धांत नाहीत, सिद्धांचा अनुभव आहे. यात त्या कोणत्याही गोष्टींची चर्चा नाही, ज्या कुतूहलातून निर्माण होतात. जिज्ञासेमुळे निर्माण होतात. नाही, यात त्यांच्याकडे अंगुलिनिर्देश आहे, जे मुमुक्षेने भरलेले आहेत आणि ज्यांनी प्राप्त केलं आहे.
प्रस्तुत ग्रंथात चर्चिल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण गोष्टी याप्रमाणे –
शिक्षक होण्यात कोणती मजा आहे?
परमात्म्याचा शोध कुठे घ्यायचा?
वासना शब्दाचा, वासनेचा अर्थ काय?
जेव्हा मृत्यू घडतो, तेव्हा कोण मरतं?
धर्म, दर्शन, विज्ञान, इतिहास, साहित्य, संस्कृती, कला इत्यादींचं कोणतंही क्षेत्र असं नाही, जे ओशोंकडून अस्पर्शित राहिलं आहे. त्यांचं विशाल साहित्य त्यांच्या विद्याव्यासंगी व्यक्तित्वाची साक्ष देतं.
वेद, उपनिषद, पुराण, महाभारत, गीता, बायबल, धम्मपद, ग्रंथसाहिब इत्यादी सर्व अभिजात साहित्य त्यांनी आत्मसात केलं आहे. त्यांचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे त्यांनी धर्मग्रंथांत लिहिलेले शब्द जसेच्या तसे कधीच स्वीकारले नाहीत. त्या शब्दांमागच्या भावनांना आपल्या मौल्यवान चिंतनानं त्यांनी प्रकट केलं. आपल्या चिंतनाचीही त्यांनी परीक्षा घेतली आणि मग त्या गूढ अर्थांना स्पष्ट केलं. त्यांची दृष्टी एका शास्त्रज्ञाची दृष्टी आहे.
– यशपाल जैन
(सुप्रसिद्ध लेखक आणि विचारवंत)