Agnirekha Swatantry Samar 1857 अग्निरेखा – स्वातंत्रसमर १८५७ by Kaka Vidhate
Agnirekha Swatantry Samar 1857 अग्निरेखा – स्वातंत्रसमर १८५७ by Kaka Vidhate
अग्निरेखा – स्वातंत्रसमर १८५७! इंग्रजांना हाकलून देश स्वतंत्र करण्यासाठी भारतीयांनी केलेला हा पहिला संघटित आणि सुनियोजीत प्रयत्न! एका बलाढ्य परकीय शक्तीशी प्रयत्नांची पराकाष्ठा करून लोक प्राणपणाने लढले. अनेकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिल. १८५७ ही भारतीयांचा पराक्रम आणि प्रयत्नांची गौरवगाथा आहे. समाजातले सर्व घटक या क्रांतीत सामील झाले होते. पुरुषांच्या बरोबरीने स्रीयाही मैदानात उतरल्या. सत्त्तावनच्या स्वातंत्र्यय संग्रामातील अनेक नेत्यांची चरित्रे लिहली गेली, पण ज्या सामान्य लोकांनी सर्वोच्च त्याग केला, त्यांच्या विषयी फारसं लिहलं गेलेलं नाही.
‘अजिजान’ हि अशीच एक सामान्य नर्तकी होती. नृत्यगायनाचा आपला व्यवसाय टाकून कानपूरच्या क्रांतीत ती सहभागी झाली. नानासाहेब पेशव्यांची अनुयायी बनून ब्रिटिशांशी शौर्याने लढली आणि देशासाठी तिने आपले प्राण दिले. यावेळी तीच वय अवघ २५ वर्षाचं होत. तिचं जीवन त्यावेळचा काळ, ब्रिटिशांचं जुलमी राज्य आणि अजिजाने ब्रिटिशांविरुद्ध दिलेला असामान्य लढा या कादंबरीत चित्रीत केलेला आहे