Agryahun Sutka Hardcover By Dr. Ajit Joshi (आग्र्याहून सुटका)
Agryahun Sutka Hardcover By Dr. Ajit Joshi (आग्र्याहून सुटका)
Couldn't load pickup availability
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्तथरारक आग्र्याहून सुटकेविषयी परिपूर्ण संशोधनात्मक ग्रंथ....! फक्त या आग्र्याहून सुटकेच्या घटनेला वाहिलेला ग्रंथ.....! छत्रपति शिवाजीमहाराजांची आग्र्याहून सुटका हा अतिशय गहन आणि गुंतागुंतीचा विषय आहे. या एकमेवाद्वितीय घटनेचे अनेक कंगोरे आणि पदर आहेत. महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचे गुपित समजण्यासाठी फक्त त्यांच्या आणि औरंगजेबाच्या हालचालींचा मागोवा घेऊन भागत नाही. इतर अनेक अनुषांगिक गोष्टींची माहिती जाणून घ्यावी लागते. उदाहरणार्थ, घोड्यांच्या दौडण्याचा वेग, त्या काळातील संदेशवहनाची व्यवस्था आणि त्यासाठी लागणार वेळ, प्रवासात राहण्यासाठी असलेल्या सराया, इत्यादी. प्रस्तुत ग्रंथांत या घटनेचे सर्व उपलब्ध अस्सल ऐतिहासिक पुरावे अनुषांगिक माहितीच्या आधारे सुलभतेने मांडले आहेत, त्यांचे विश्लेषण केले आहे. महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा नवा सिद्धांत मांडला आहे. आग्र्याहून सुटकेची मिठाईच्या पेटाऱ्यांची कथा चुकीची कशी आहे इथून सुरुवात करून एकूण १६ प्रकरणांमधून शिवाजीमहाराजांचे आग्र्याहून सुटकेचे रहस्य उलगडून दाखविले आहे. शेवटी पेटाऱ्यांची कथा का पसरली याचेही विवेचन केले आहे. शिवाय दहा नकाशे आणि दोन परिशिष्टे समाविष्ट केली आहेत. एकूण १०३ संदर्भग्रंथांची मदत घेऊन हा ग्रंथ सिद्ध केला आहे. "Agrayhun Sutka" book presents a new reconstruction of Raja Shivaji's escape from Agra in 1666 AD, based on original historical documents. Sixteen chapters, two appendices and ten maps describe how Raja Shivaji escaped from Agra. This second edition, published in 2016 also includes a review of various books, dramas, movies, produced on this story. Allied important information such as speed of horses, sarais or lodges for travelers, methods of communication in those times, etc. are also covered in detail.