Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Rs. 315.00Rs. 350.00
भारतीय स्वातंत्र्यलढ्याची धुरा नक्की कोणाच्या खांद्यावर होती? शेतकरी, कष्टकरी, गृहिणी, कारागीर, रानावनात वनोपज गोळा करणारे किंवा असेच इतर लाखो सामान्य लोक इंग्रज राजवटीपुढे टाच रोवून उभे राहिले. यांतले कुणी ना पुढे मंत्री झाले, ना राज्यपाल किंवा राष्ट्रपती. त्यांची वर्णी फार मोठ्या शासकीय पदावरही कधी लागली नाही. या सगळ्यांमध्ये एक समान धागा होता इंग्रज साम्राज्य आणि राजवटीला असलेला कडवा विरोध. 'अखेरचे शिलेदार' या पुस्तकात स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ असलेले काही जण त्यांची गोष्ट आपल्याला सांगतात. आदिवासी, दलित, इतर मागासवर्गीय, मुस्लीम, हिंदू आणि शीख पंथाची माणसं आहेत ही. ते वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारताच्या विविध प्रांतांतली, विभिन्न संस्कृती जपणारी आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीची ही मंडळी आहेत. काही आस्तिक आहेत; तर काही नास्तिक, काही डावे, काही गांधीवादी; तर काही आंबेडकरवादी.. या पुस्तकातले शिलेदार आपल्याला एक प्रश्न विचारतात : 'स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? त्यांच्यासाठी केवळ स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य नव्हतं.. १९४७ नंतरही त्यांचा संघर्ष सुरूच राहिला. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या प्रत्येकाला या गोष्टींची गरज आहे. स्वातंत्र्यसैनिकांना जे उमगलं, ते आपल्याला कळलं पाहिजे. केवळ स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य नाही, हे उमगलं पाहिजे, तसंच या दोन्हींची सांगड कशी घालायची तेही..
Categories:
Translation missing: en.general.search.loading