Skip to product information
1 of 1

Ameriki Rashtrapati By Atul Kahate

Ameriki Rashtrapati By Atul Kahate

Regular price Rs. 446.00
Regular price Rs. 495.00 Sale price Rs. 446.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Condition
Language
अमेरिका हा जगामधला अगदी निर्विवादपणे सगळ्यांत ताकदवान देश असल्यामुळे अमेरिकी राष्ट्रपती या पृथ्वीतलावरचा सगळ्यांत ताकदवान माणूस असणं स्वाभाविकच आहे. दर चार वर्षांनी अमेरिकेमध्ये राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक होते. २०१६ मध्ये अमेरिकेचा पंचेचाळिसावा राष्ट्रपती निवडला जाण्यासाठीची निवडणूक होणार आहे. या पाश्र्वभूमीवर आजवरच्या अमेरिकी राष्ट्रपतींच्या कामगिरीचा आणि त्यांच्या आयुष्यांचा आढावा घेणं खूपच महत्त्वाचं आणि रंजकसुद्धा आहे. लेखकाच्या अवलोकनानुसार अमेरिकेची दहशतवादाच्या संदर्भातली भूमिका सातत्यानं दुटप्पी आहे. इस्राईल, पाकिस्तान, निकारागुआ, अल साल्वादोर अशा अलीकडच्या मित्रांच्या दहशतवादाविषयी अमेरिकेला फारसं दुःख होत नाही; उलट त्यांच्या कृतींचं ती सरळ समर्थनच करते. याउलट अफगाणिस्तान, पॅलेस्टाईन, सीरिया, लीबिया, इराण अशा ठिकाणच्या दहशतवादाला मात्र अमेरिका आपला शत्रू मानते. साहजिकच अमेरिकेच्या या भूमिकेचा जगभरातल्या अनेक देशांमध्ये तीव्र निषेध केला जातो आणि यातून अमेरिका आपल्या शत्रूंची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवते. म्हणूनच खरा दहशतवादी देश कोण आहे, असा विचार आपण करायला लागलो, की सगळ्या जगाच्या लोकशाहीचा, सुरक्षिततेचा आणि शांततेचा मक्ता आपणच घेतला असल्याच्या थाटात वागणाNया आणि प्रत्यक्षात बरोबर याच्या उलट पावलं टाकणाऱ्या अमेरिकेचा खरा चेहरा समोर येतो. अमेरिकेच्या धोरणांचे पडसाद जगावर खूप मोठ्या प्रमाणावर उमटत असल्यामुळे अमेरिकी राष्ट्रपतींचा इतिहास जाणून घेणं, भविष्यात काय घडू शकतं हे समजून घेण्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल, यात शंकाच नाही! हाच या पुस्तकाचा गाभा आहे.
View full details