Amol Ratna Birbal Ani Itar Katha by Manjusha Amdekar अमोल रत्न बिरबल
Amol Ratna Birbal Ani Itar Katha by Manjusha Amdekar अमोल रत्न बिरबल
Couldn't load pickup availability
AMOL RATNA BIRBAL ANI ITAR KATHA by MANJUSHA AMDEKAR
अकबर आणि बिरबल ही जोडी बोधपर कथांच्या राज्यातील बालमनावर योग्य तो परिणाम करणारी जोडी आहे. अनेक पिढ्या यांच्या कथा वाचत – ऐकत – सांगत मोठ्या झाल्या आहेत. अकबरच्या दरबारात येणारी निरनिराळी माणसं आणि त्यांच्या विचित्र समस्या सोडवण्याचे काम बिरबल करत असतो. कधी कधी सम्राट अकबरही त्याच्या परीक्षा घेतो; तर एखाद वेळेस बिरबल सम्राट अकबरांची परीक्षा घेतो. राज्यातील प्रत्येक घडामोडीवर बिरबलचं लक्ष असतं आणि ते लक्ष ठेवण्यासाठी अकबर-बिरबल दोघंही वेष पालटून राज्य भ्रमंतीवर जातात. बसून खाणार्या लोकांपेक्षा कष्टाची भाकर खाणार्या माणसांवर बिरबलाचं प्रेम असतं. राज दरबारातल्या काही अति अहंकारी लोकांच्या डोळ्यांत खटकणारा बिरबल न वैतागता त्यांनाही चोख प्रत्युत्तर देतो. बिरबलाच्या बुद्धिचातुर्य आणि हजरजबाबी पणाच्या अशाच काही बोधपर कथा, मुलांबरोबर मोठ्यांनाही सांगायला अकबर-बिरबल स्वत: आले आहेत.
Share
