Skip to product information
1 of 1

Anasakta Karmayogi by S. K. Akshikar अनासक्त कर्मयोगी

Anasakta Karmayogi by S. K. Akshikar अनासक्त कर्मयोगी

Regular price Rs. 125.00
Regular price Sale price Rs. 125.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

"अनासक्त कर्मयोगी" या चरित्राचे लेखक श्री श्रीकृष्ण केशव अक्षीकर हे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील शिक्षण विभागातून सहसचिव या सन्मान्य पदावरून सेवानिवृत्त झालेले राजपत्रित अधिकारी आहेत . ते एक चांगले ललित लेखकही आहेत . आजवर त्यांची ‘ कन्सल्टिंग रूम ‘ केशव अक्षीकर ‘ आदरांजली ‘ , ‘ अशी ( ही ) माणसं ‘ , ‘ माझ्या मनातलं ‘ व ‘ रिकामपणाचे उपद्व्याप ‘ ही पाच ललित पुस्तके प्रकाशित झालेली आहेत . त्यांनी एके काळी ‘ सुगत ‘ या नावाने वासंतिक व दिवाळी अंकांचे संपादनही केले होते . या चरित्राचे नायक कै . गो . ना . अक्षीकर यांचे ते नातू आहेत . टिळक – आगरकरांच्या अध्यापनाचा लाभ घेत त्यांच्याच ‘ राष्ट्रीय ‘ शाळेतून मॅट्रिक झालेल्या कै . गो . ना . अक्षीकरांनी आपल्या या गुरुद्वयाकडून शिक्षणप्रसाराचा संस्कार कसा घेतला ; दादर , ठाणे व कल्याण या एके काळच्या मागासलेल्या ‘ खेड्यां मध्ये सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी कशा शाळा काढल्या , त्या काळात शिक्षणक्षेत्रात दुर्मीळ असणाऱ्या ‘ रात्रशाळा ‘ व ‘ इंडस्ट्रियल स्कूल ‘ या संकल्पना कशा प्रत्यक्षात आणल्या , हे सर्व करीत असताना देणग्यांवर अवलंबून न राहता स्वत : च आर्थिक पदरमोड कशी केली , यश , कीर्ती , नाव आणि स्वतःचे छायाचित्रही यांपासून ते निष्ठेने कसे अलिप्त राहिले , यांचे एक हृद्य व प्रेरणादायी चित्र या चरित्रात पाहवयास मिळते . योगायोगाने कै . गो . ना . अक्षीकर सुवर्णजयंती वर्ष आणि त्यांनीच स्थापन केलेल्या दादर – मुंबईच्या छबिलदास शाळेची शतकोत्तर रजतवर्षपूर्ती या २०१४ त येणाऱ्या दोन मंगल मुहूर्ताच्या उंबरठ्यावर हे चरित्रपुस्तक प्रकाशित होत आहे . याच्या वाचनाने शिक्षणक्षेत्रातील मंडळींना कार्यऊर्जा प्राप्त व्हावी आणि विद्यार्थ्यांवर ध्येयासक्ती व अनासक्तीचा संस्कार व्हावा , हीच एक इच्छा .

– डॉ . द . दि . पुंडे

View full details