Andhalya Baiche Vanshaj By Anees Salim Translated By Shyamal Chitale
Andhalya Baiche Vanshaj By Anees Salim Translated By Shyamal Chitale
Regular price
Rs. 266.00
Regular price
Rs. 295.00
Sale price
Rs. 266.00
Unit price
/
per
"हम्सा आणि अस्मा या जोडप्यांची मुलं सोडली, तर त्या दोघांचं मिळून एकत्र म्हणावं असं काहीच नाही. अमर त्यांचा सगळ्यात धाकटा मुलगा. तो त्याच्या मामासारखा दिसतो. मामा आता या जगात नाही. अमरला एक रूपगर्विष्ठ बहीण आहे, जसिरा. त्याचा अकमल नावाचा भाऊ भलत्याच मार्गाला लागलाय. कर्मठ धर्म पाळता पाळता तो अतिरेकी बनतोय. त्याच्या सोफिया नावाच्या बहिणीचा बुडून अपघाती मृत्यू झालाय. एके काळी समृद्ध असणाऱ्या या कुटुंबाला उतरती कळा लागलीय. आपल्या आयुष्याला ते तोंड कसं देतायत, तेच या कादंबरीत सांगितलंय. दोन्ही भावांचा सुन्ता समारंभ आणि जसिराची शादी सोडली, तर त्यांच्या आयुष्यात सुखाचे प्रसंग येत नाहीत. शाळेच्या दिवसांपासून अमरचा संदीप नावाचा मित्र आहे. त्याचा अमरच्या आयुष्यावर बराच प्रभाव आहे. जसिराची शादी पार पाडण्यासाठी आंधळ्या आजीला फसवून तिचं घर विकतात आणि नंतर ती अमरच्याच घरी राहायला येते. अमरचं घर आणि आसपासचा परिसर याचं तपशीलवर वर्णन येतं. तिथंच तर बहुतांश कथानक घडतं. त्यांच्या छोट्याशा गावाच्या साध्याशा जीवनाचं परिणामकारक वर्णन केलंय. जसिराच्या शादीच्या वेळी घराची साफसफाई करत असताना त्यांच्या हाती फोटो लागतात. त्यामुळे अमर आणि त्याचा मामा यांच्या आयुष्यात असणारी समानता स्पष्ट व्हायला लागते. अमरची आत्या, तिची मुलगी जसिरा, संदीप, अमरच्या वडिलांचं दुसरं कुटुंब इत्यादी उपकथानकंही आहेत, त्यामुळे अमरच्या स्वभावचित्रणात भर पडते आणि कथानकही पुढे सरकतं. शेवटी अमरचं भविष्यही त्याच्या मामासारखं ठरतं. सविसाव्या वर्षी आत्महत्या. खरं तर, सुरुवातीलाच आपल्याला शेवटाची स्पष्ट कल्पना दिलीय. तरीही कथानकाची मांडणी आणि भाषाशैली आपल्याला गुंतवून ठेवते. "