Angtha, Like Ani Dronacharya by Dr. Ravindra Laxmikant Tamboli |अंगठा, लाईक आणि द्रोणाचार्य रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी
Angtha, Like Ani Dronacharya by Dr. Ravindra Laxmikant Tamboli |अंगठा, लाईक आणि द्रोणाचार्य रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी
Couldn't load pickup availability
समकालीन जगात अंगठ्याचा वापर ज्यापद्धतीने होतो, ते पाहता एकलव्याचा अंगठा द्रोणाचार्यांनी का मागितला असेल, याचा अंदाज सहज येतो. दुपारच्या गाढ झोपेत असलेल्या लेखकाला स्वप्नात येऊन द्रोणाचार्य सांगून जातात - "अंगठा सांभाळा! नाहीतर तोच तुमचं आयुष्य स्क्रोल करून नेईल!”
लेखकाला लाभलेल्या या विलक्षण द़ृष्टीतून सिद्ध झालेल्या कथा या संग्रहात आहेत - लाईकसाठी आसुसलेली माणसं, कमेंटमध्ये जगणारे विचारवंत, फॉरवर्डमध्ये वाढणारा विकास आणि मोबाईलमध्ये कैद झालेलं मन! ज्याला घरात कुणी विचारत नाही, पण फेसबुकवर ‘जबरदस्त!’ असलेला भाऊ, राजकीय लाँचिंग, घोषणांचा पाऊस आणि कामांचा दुष्काळदेखील आहे.
विनोदी, हलकंफुलकं आणि एकदा हातात घेतलं की खाली ठेवता येणार नाही असं हे पुस्तक! हसवणारं, चिमटे काढणारं आणि कधी कधी अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करायला लावणारं - अंगठा वापरणार्या प्रत्येकासाठी...
हे पुस्तक वाचताना एक काळजी मात्र नकी घ्या - मध्येच मोबाईल उचलून ‘हा परिच्छेद भारी आहे’ म्हणून पोस्ट करून अंगठ्यांच्या नादी लागू नका! कारण हे पुस्तक तुम्हाला आवडेलच याची आम्हाला खात्री आहे. पोस्टला हार्ट मिळविण्यापेक्षा पुस्तकाला तुमच्या मित्र-मैत्रिणींच्या हाती द्या. ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा आणि आवर्जून घ्यायला सांगा.
नाहीतर... द्रोणाचार्य आहेतच!
Share
