Asahi Ek Kimayagar by Anjali Thakur
Asahi Ek Kimayagar by Anjali Thakur
एका मराठी तरुणानं जी गगनभरारी घेतली आहे, तो आदर्श सर्व मराठी तरुणांनी लक्षात ठेवायला हवा. शोधक वृत्ती, समाज व देशाबद्दलची कटिबध्दता, सतत नवनवीन उपक्रम करण्याचा उत्साह, सकारात्मकता, सृजनशीलता हा त्यांचा स्वभाव आहे. नोकरी मागणारा नव्हे तर अनेकांना नोकरी देणारा तरुण उद्योजक म्हणून हणमंतराव अनेकांचा आदर्श, अनेकांचे ‘ आयकॉन' बनले आहेत. त्यांच्यावरील अंजली ठाकूर यांचं हे पुस्तक सर्व मराठी तरुणांना प्रेरणा देईल, याचा मला विश्वास वाटतो. नितीन गडकरी केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग खाते हणमंतरावांचे मुख्य ध्येय आहे की, जितके शक्य आहे, तितके समाजाचे हित करण्याचा प्रयत्न करायचा. ते नेहमी म्हणतात की, त्यांना दहा कोटी लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचा आहे; आणि ते ज्या पद्धतीने काम करीत आहेत, त्यातून लवकरच आपले ध्येय गाठतील. नुसते उपदेश देऊन नव्हे तर त्यांनी त्यांच्या स्वत:च्या वागणुकीतून अनेकांना काम करण्याची प्रेरणा दिली आहे. अनेक तरुणांना त्यांचे ध्येय गाठण्यास मदत केली आहे. शरद बोबडे पूर्व सरन्यायाधीश