Your cart is empty now.
'जगाची संपर्कभाषा किंवा ज्ञानविज्ञानाची माध्यमभाषा म्हणून इंग्रजीचे स्थानमाहात्म्य सर्वांनाच माहीत आहे. त्या भाषेतील शब्दसंपत्ती जवळ असेल, तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याचा मार्ग सुकर होतो, असा अनेकांचा अनुभव आहे. आपल्या अवतीभवती घडणा-या विविध घटनांची माहिती देता देता इंग्रजीतील शब्दांचा अर्थासह परिचय करून देणारे रंजक शैलीतले, ‘साप्ताहिक सकाळ’मधील वाचकप्रिय सदरातले ताजे पन्नास लेख संकलित स्वरूपात जिज्ञासूंच्या हाती देणारे हे पुस्तक... आधीचे पाच भाग घेतलेल्या वाचकांनाही हा सहावा भाग वाचावासा वाटेल आणि हाच भाग प्रथम घेणा-या वाचकांना आधीचे पाचही भाग विकत घेऊन संग्रही ठेवावेसे वाटतील... कारण प्रत्येक भागात दडली आहे अस्सल यशाची एक गुरुकिल्ली!
Added to cart successfully!