‘अशी मने असे नमुने’ हा शिवाजी सावंत यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला व्यक्तिचित्रसंग्रह आहे. आजरा हे त्यांचं मूळ गाव. या गावातील त्यांच्या स्मरणातील व्यक्तींचं व्यक्तिचित्रण त्यांनी या संग्रहातून केलं आहे. आधी त्या व्यक्तीचं बाह्य वर्णन, मग त्या व्यक्तीचा लेखकाशी असलेला संबंध, त्या व्यक्तीशी संबंधित काही प्रसंग, त्यात त्या व्यक्तीचं वेगळेपण किंवा खास वैशिष्ट्य दर्शवणारा एखादा प्रसंग आणि त्या व्यक्तीबाबतची सद्य: परिस्थिती अशा पद्धतीने ही व्यक्तिचित्रे साकारली आहेत. लेखकाचे बालमित्र कांत्या आणि शंकऱ्या, नाटकात शिवाजीची भूमिका करणारा गणपा, शाळेत शिपाई असलेला मामू, शिकारी असलेला नारायण पावणा, समाजसेवक असलेले काका गवंडळकर अशा विविधरंगी व्यक्ती या व्यक्तिचित्रसंग्रहातून भेटतात. तर या व्यक्तींना भेटण्यासाठी, वैशिष्ट्यपूर्ण भाषेसाठी आणि भावनांची आंदोलने अनुभवण्यासाठी प्रत्येकाने हा व्यक्तिचित्रसंग्रह नक्कीच वाचला पाहिजे.
.