मुलभूत, आधुनिक, सैद्धांतिक तसेच क्लिष्ट विज्ञान जर का तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर विज्ञान कथा हे एक प्रभावी माध्यम आहे असे मानणा-या डॉ. संजय ढोले यांचा हा विज्ञान कथासंग्रह. त्यांच्या विज्ञान कथा वाचताना वाचक हा कथेच्या परमोच्च बिंदूवर आरुढ तर होतोच होतो, पण त्याच्या सोबतच त्याचं वैज्ञानिक प्रबोधनही होतं. ज्याचा फारसा विज्ञानाशी संबंध नाही अशा वाचकांनाही डॉ. ढोले यांच्या कथा गुंतवून ठेवतात. कारण त्या विज्ञानाच्या सहाय्याने रहस्यभेद करणा-या आहेत. या संग्रहात त्यांनी पेशी, अंतराळ, अतिसूक्ष्म तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, वनस्पती, शरीर, किरण अशा शास्त्रांच्या द्वीविध अंगांना स्पर्श केलेला आहे. म्हणूनच या कथा वाचतांना वाचकांचे मनोरंजन तर होईलच, पण त्यांची बौद्धिक पुर्तता होईल याची काळजीही त्या घेतात.
.