Skip to product information
1 of 1

ASWASTH PARV- VEDH JAGTIK GHADAMODINCHA By Shriram Pawar

ASWASTH PARV- VEDH JAGTIK GHADAMODINCHA By Shriram Pawar

Regular price Rs. 359.00
Regular price Rs. 399.00 Sale price Rs. 359.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language
एका बाजूला प्रचंड कुतूहल वाटावं आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड अस्वस्थता असावी अशा काळातील जागतिक घडामोडींचा वेध प्रस्तुत लेखन घेतं . 
प्रगतीसाठीची धोरणं  राबवताना जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग सर्वांना व्हावंच लागेल ; ही वाटचाल उदारमतवादी लोकशाही बळकट करणारी ठरेल ; लोक जगाच्या व्यवहारात इतके सामावले जातील , की ते जागतिक नागरिक म्हणवणं  पसंत करतील ; त्यातून राष्ट्र - राज्य संकल्पनेतील सीमारेषाही धूसर व्हायला लागतील ; या आदर्शवादाला ,त्यातील गृहीतकांच्या फुग्याला तीस वर्षांच्या वाटचालीनंतर टाचणी लावणारं वळण जागतिक व्यवहारात आलं आहे. 
हे का आणि कसं घडत गेलं ,या प्रश्नाचा शोध हे पुस्तक घेतं . 
वंश ,धर्म अशा बाबींवर आधारलेला बहुसंख्यांकवाद  जगाच्या अनेक भागांत बोकाळतो आहे. 
अल्गोरिदम ,आर्टिफिशयल इंटेलिजन्स ,रोबोटिक्स ,नॅनो टेक्नॉलॉजी आणि डेटा सायन्स ही वर्चस्वाच्या लढाईची हत्यारं बनताहेत . यातून निर्माण होणारे नवे ताण ,नवी स्पर्धा ,जगाच्या अस्वस्थतेत भर टाकते  आहे. या पार्श्वभूमीवर 'क्वाड 'सारखा गट बळकट होतो आहे. त्यातून इंडो-पॅसिफिक सागरी क्षेत्र हे प्रमुख स्पर्धा होण्याची चिन्हं दिसताहेत . 
हे पुस्तक ज्या काळातील घडामोडींवर  आधारित आहे त्याला अस्वस्थतेचे असे अनेक पदर आहेत . या घटना -घडामोडींचा वेध आणि विश्लेषण हा या पुस्तकाचा गाभा आहे .  
View full details