Skip to product information
1 of 2

Aurangzeb The Man and the Myth by Audrey Truschke (Marathi) औरंगजेब व्यक्ती आणि मिथक ऑड्री ट्रश्की

Aurangzeb The Man and the Myth by Audrey Truschke (Marathi) औरंगजेब व्यक्ती आणि मिथक ऑड्री ट्रश्की

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

भारताच्या इतिहासातील सर्वांत तिरस्करणीय शासकाचे चरित्र

सहावा मोगल बादशाह औरंगजेब आलमगीर (राजवटीचा काळ १६५८ ते १७०७) याची भारतातील लोकांकडून सर्वांत जास्त निंदा केली जाते, त्याचा तिरस्कार केला जातो. हिंदूंचा द्वेष करणारा, खुनी आणि धर्मांध अशा शब्दांत त्याचे वर्णन केले जाते. विशेषतः ब्रिटीश राजवटीच्या काळातील विचारवंतांनी औरंगजेबविषयी ‘हिंदूंचा तिरस्कार करणारा धर्मवेडा मुस्लीम शासक’ असे जे मत पसरवले आहे तेच बहुसंख्य भारतीय धरून बसले आहेत. न्यायी, सत्पात्र शासक होण्यासाठी कसून प्रयत्न करणारा मोगल बादशाह अशीही एक बाजू औरंगजेबच्या चरित्रात आहे. वाचकांच्या मनाची पकड घेणाऱ्या या चरित्रात ऑड्री ट्रश्की यांनी वाचकांना औरंगजेब या वादग्रस्त मोगल बादशाहचे एका निराळ्या दृष्टीने दर्शन घडवले आहे आणि त्याच्याविषयीच्या सार्वजनिक वादात मोठ्या धाडसाने एक निराळे विरोधी मत मांडले आहे.

“अत्त्युत्तम… गुंतागुंतीच्या, वादग्रस्त ऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे कशी लिहावीत? याचे उत्तम उदाहरण.”

द हिंदू

“टूश्की यांच्या लिखाणात बुद्धिचातुर्यही आहे आणि आवडीचा विषय असल्याने उत्साहही आहे.”

वॉल स्ट्रीट जर्नल

“ऑड्री टूश्की यांचे संशोधन औरंगजेबबद्दलचा तुमचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलेल.”

हिंदुस्तान टाईम्स

View full details