Auschwitzcha Photowala by Maurizio Onnis & Luca Crippa ऑशवीटझचा फोटोवाला
Auschwitzcha Photowala by Maurizio Onnis & Luca Crippa ऑशवीटझचा फोटोवाला
Couldn't load pickup availability
AUSCHWITZCHA PHOTOWALA by MAURIZIO ONNIS & LUCA CRIPPA
"जर्मनीतील सामूहिक हत्याकांडाच्या केंद्रस्थानी घडणारी ही धाडसी आणि आशा वादी कथा आहे. जर्मनीने १९३९ मध्ये पोलंड वर विजय मिळवला. तेव्हा विलहेम ब्रेस याला हिटलर गोटात सामील होण्याचा आदेश करण्यात आला. त्याने तो नाकारला. मग त्यानंतर राजकीय कैदी नंबर ३४४४ म्हणून त्याला अशविट्झच्या छळछावणीत पाठवण्यात आले. शुट्झशाफेलनी त्याला छावणीतील आतील कामाचा लेखाजोखा मांडण्याचे काम दिले. छावणीत येणाऱ्या कैद्यांचे फोटो घेण्यापासून त्याने कामाला सुरवात केली आणि कालांतराने जोसेफ मेंगल यांनी गुन्हेगारांवर केलेले वैद्यकीय प्रयोग आणि प्रत्यक्ष कैद्यांच्या कित्येक फाशी नोंदवण्यापर्यंत त्याने काम केले. १९४० ते १९४५ दरम्यान, ब्रेसने त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या भयानक घटनांचे ५०,००० फोटो घेतले. तसे फोटो काढत बसण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. पुढे पुढे त्या कॅमेराच्या मागे लपून राहणे ब्रेसच्या विवेक बुद्धीला पटेना. सुरवातीला तो छावणीतील रहिवासी चळवळीत सहभागी झाला. कैद्यांची खोटी कागदपत्रे तयार करणे, या छावण्यांमध्ये काय चालू आहे हे बाहेरच्या जगाला कळावे म्हणून आटले फोटो बाहेर पाठवणे अशा गोष्टी तो या चळवळीतून करू लागला. नंतर शेवटी सोव्हिएत सैनिक आले तेव्हा शुट्झशाफेलनी ब्रेसला ते फोटोग्राफ नष्ट करण्याचे आदेश दिले. ते आदेश नाकारत ब्रेस म्हणाला, `कारण ,जगाला हे कळलं पाहिजे`. "
Share
