बैरागड ही काही कल्पित कथा नव्हे ते एक कठोर वास्तव आहे. आदिवासींच्या उत्थानासाठी धडपडणार्या एका ध्येयवेड्या दाम्पत्याची ती एक संघर्षगाथा आहे. निसर्गानुकूल जीवन जगणार्या आदिवासींच्या साध्या सरळ आयुष्याला छेद देणार्या अनेक अपप्रवृत्ती आजही कार्यरत आहे. जबरदस्तीचे धर्मांतरण, त्यांच्या श्रमाचे शोषण, नैसर्गिक साधन संपत्ती वरील नाकारला जाणारा त्यांचा आदिम हक्क एक ना अनेक बाबी.
अशा अनेक दृष्टप्रवृत्तीशी दोन हात करीत, जिवावरच्या आपत्तीशी झुंज देत डॉक्टर रवींद्र कोल्हे व डॉक्टर स्मिता कोल्हे हे दांपत्य बैरागड येथे पाय रोवून उभे आहे. आदिवासींचा विश्वास संपादन करीत त्यांच्या जीवनापला विकासोन्मुख करण्याचा त्यांचा प्रयत्न अविरत सुरू आहे.
या दाम्पत्याचे कर्तव्यकठोर आयुष्य प्रत्यक्ष अनुभवून त्यात सहभाग घेऊन लेखकाने त्यांची संघर्षगाथा शब्दबद्ध केलेली असल्यामुळे ती अधिक जिवंत, रसरशीत व वास्तवदर्शी झालेली आहे.
Bairagad | बैरागड by AUTHOR :- Manohar Naranje
Bairagad | बैरागड by AUTHOR :- Manohar Naranje
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
/
per