‘‘मी एक साधं काम करतोय. वेडगळ आणि निर्जीव गर्दीतून स्वतंत्र, जिवंत व्यक्ती बाहेर काढण्याचं काम! त्यांना स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा देण्याचं काम!... थोडक्यात तुम्ही विद्रोही म्हणून जगावं, यासाठी माझी खटपट चाललेली आहे... विद्रोही व्यक्तीची यात्रा ही आश्चर्याच्या धक्क्यांनी भरलेली असते. त्याला नकाशा नसतो की कुणी मार्गदर्शक नसतो. प्रत्येक क्षणी विद्रोही एका नव्या अवकाशात प्रवेश करतो, एका नव्या अनुभवात प्रवेश करतो... हा प्रवेश त्याच्या स्वत:च्या सत्यात केलेला प्रवेश असतो तो त्याचा स्वत:चा आनंद असतो... आणि ते त्याचं स्वत:चं प्रेम असतं.’’