Bharatiy Vivah Santhecha Itihas भारतीय विवासंस्थेचा इतिहास
Bharatiy Vivah Santhecha Itihas भारतीय विवासंस्थेचा इतिहास
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
– इतिहासाचार्य वि. का. राजवाडे
वनपर्वाच्या ३०७व्या अध्यायात सूर्य म्हणतो, "हे कुंती, कन्या शब्दाची उत्पत्ती कम् धातूपासून झालेली असून त्याचा अर्थ हव्या त्या पुरुषाची इच्छा धरू शकणारी असा आहे. कन्या स्वतंत्र आहे. स्त्रिया व पुरूष यांच्यामध्ये कोणताही प्रकारचा आडपडदा नसणे हीच लोकांची स्वाभाविक स्थिती असून, विवाहादिक संस्कार सर्व कृत्रिम आहेत. यास्तव तू माझ्याशी समागम कर. ..."
- इतिहासाचार्य वि. का. राजवाडे. (भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास)
प्रागैतिहासिक काळातील समाजाची जडण-घडण, विशेषत: भारतीय विवाहसंस्था, कुटुंबजीवन, समाजजीवन व रुढीं कश्या उत्क्रमीत होत गेल्या याचा या पुस्तकात लेखाजोखा घेतलेला आहे. महाभारतपूर्व - महाभारतकालीन व त्यानंतरचा समाज आणि त्यांची विचारधारा कसकशी बदलत गेली हे सांगताना ठिकठिकाणी महाभारत व वेदातील संस्कृत श्लोक उधकृत केले आहेत.
महाभारतात व हरिवंशात ब्रम्हाची प्रजोत्पाताची वंशावळीत (आदिपर्व ६६) एक मुख्य गोष्ट दिसून येते ती म्हणजे सख्खी भावंडे, चुलत भावंडे, चुलता-पुतणी आणि बाप-मुलगी (मनू - इला, वसिष्ठ प्रजापती - शतरूप ) यांचे शरीरसंबंध होते असं व्यासानी लिहून ठेवलंय आणि या चालींना ऋग्वेद ही पुष्टी देतो. अशीच चाल मिसर समाजातही रूढ होती जी क्लिओपात्राच्या काळातही अस्तित्वात होती, असं त्यांचा इतिहास नमूद करतो. अर्थात, हे तत्कालीन समाजमान्य असल्यामुळे निंद्य नव्हते. जर अविवाहित मुलीला परपुरुषाकडून अपत्य झाले तर ते त्या मुलीच्या बापाचे नाव लावू शकत होते, संपत्तीचाही उपभोग घेऊ शकत होते आणि त्या अपत्याला पिंडही देता येत होते असं वशिष्ठसंहिता सांगते. अनेक पुरुष एकाच स्त्रीशी संबंध ठेवू शकत होते व उलट हे हरिवंशात दिसून येत. तथापि, या साऱ्या चाली महाभारतातील जन्मेन्जयाच्या काली निंद्य होत्या, समाजमान्य नव्हत्या. तसेच, कर्णही शल्याची यासाठीच निंदा करतो, हेही व्यासानी नमूद केले आहे. अश्याच चाली आयर्लंड, पर्शिया वगैरे भागातही प्रचलित होत्या, हे लोकही त्यांच्या आया-बहिणींशी विवाह करीत असत.
महाभारतात स्त्री-पुरुष उघड्यावर (आदिपर्वात अध्याय १०४) वा यज्ञ भूमीवर समागम करीत, यातून अपत्येही जन्मत (सिता - द्रौपदि, या अयोनिज म्हणजे घराबाहेर जन्मलेल्या) अशी नोंद आढळते. पेशवेकाळातही 'घटकंचुकी' (काही निवडक स्त्रीपुरुष जमत आणि घागरीमध्ये सर्व बायकांच्या चोळ्या जमा करत, मग पुरुष त्यातून ज्या बाईची चोळी काढे त्या बाईशी सर्वासमोर रममाण होई) खेळली जायची, तीच प्रथा कर्नाटक, तामिळ मध्ये ५० वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. अशीच काहीशी चाल सीझर काली त्यांच्याकडे फार लोकप्रिय होती. परंतु, यात कोणती जोरजबरदस्ती नव्हती.
देवसमाज व आर्यसमाज यात देव नेहमीच वरचढ राहले आणि त्यांनी आर्यांच्या मालमत्तेवर (यांची मुख्य मालमत्ता म्हणजे स्त्रिया) ताबा मिळविला, हा हक्क इतका जबरदस्त होता कि स्त्री जन्मली कि तीवर देवांचा पहिला हक्क, युरोपातील Prelibation सारखा. मग हे आर्यसमाजी लोक देवांना त्यांच्या चीजवस्तू (हिरवे धान्य, साचलेले तूप, लाह्या) देऊन स्त्रिया देवांच्या अग्रोपभोगातून सोडवून आणत. अग्रोपभोगाची हि प्रथा सरंजामी वतनातही चालू होती. शिवाय, अजूनही प्रशियाच्या नेदरलँड आणि जर्मनीच्या काही लॉर्ड आजही हा आपला हक्क आहे असा दावा करतात. त्यांचाच परिणाम म्हंणून आजही विवाहात 'लाजाहोम' करतात, काही ठिकाणी 'अवदानही' म्हणतात, त्याची सारी प्रक्रिया हि वधूला मुक्त करण्यासंबंधी आहे. म्हणजेच आपण आजही या लाजिरवाण्या प्रथेला डोक्य्वर मिरवतो.
माधवी आख्यान (उद्योगपर्व १०६) मध्ये ययाती राजाने त्याची मुलगी माधवी हिला गुरुदक्षिणा म्हणून दिली, गालव ऋषीने स्वतःची मुलगी म्हणून तिला ३ राजांना प्रत्येकी एक पुत्र होईतो भाड्याने दिली. तद्दननंतर, विश्वामित्राला भार्या म्हणून दिली, तिच्यापासून विश्वामित्राला पुत्र प्राप्ती झाल्यावर गालवने तिला त्याच्या पित्याकडे सुपूर्त केली. तात्पर्य हे कि त्या काळी मुली भाड्याने वा विकत देता होत्या, यावर उपजिविकाही करीत, त्यांना 'भाटीक' (अपभ्रंश भाड्या) म्हणत.
दम ऋषी मृगीसोबत संग करताना पंडू राजाकडून मारला गेला आणि त्याने पंडुला शापदग्ध केलं, इथं हे लोक पशुसोबतही मैथुन करीत असं न लिहिता व्यासांनी ते रूप पालटून कामक्रीडा करीत होते असं लिहिलं अथवा पंडू राजाच्या सहमतीने कुंतीला ३ परपुरुषांपासून (विवाहापूर्वीचा पकडून ४) आणि माद्रीला २ परपुरुषांपासून पुत्रप्राप्ती झाली. हि काही शे वर्षांपूर्वीची उघडीनागडी कथा व्यासांना धर्म - नीतीला गौण आणणारी वाटली त्यामुळे त्यांनी हि पुत्रप्राप्ती देवांकडून झाली असे लिहिले. पण केवळ असे प्रथम व्यासांनीच केले असे वाटत नाही. कुमारी मेरीला कोना परपुरुषापासून ख्रिस्त झाला, पण यालाही यहुद्यांनी दडवून त्यालाही देवपुत्र केले. कारण, व्यास आणि हे ख्रिस्ती पंडित यांना हे धर्मबाह्य वर्तन वाटलं म्हणून त्यांचा हा आटापिटा.
बहूपतीत्व हि चाल शातवाहन आंध्रवासियांत, आंध्रभृत्य व ऑस्ट्रेलिया-टॅस्मेनिया इथे अस्तित्वात होती.
अतिथींना, मित्रांना स्वस्त्री उपभोर्थ दिली जायची, हि प्रथा ग्रीक मधेही प्रचलित होती असं प्लूटो - केटो नमूद करतो. तसंच, शांतिपर्वात (१६८) गौतम ब्राह्मणाला कुणी दासी दिल्याचा उल्लेख आहे. अनुशाशन पर्वात सुदर्शनची कथा आहे, तो त्याच्या भार्येला तसा उपदेश करतो आणि जेव्हा त्याच्या अपरोक्ष तसं घडतं तेव्हा स्वतःला धन्य झालो असं म्हणतो व बायकोची पतिव्रताधर्माबद्दल पाठ थोपटतो. अर्थात, हि चाल कालौघात बंद पडली, त्याचं उदाहरण म्हणजे, (शांतिपर्वात २६६) गौतमाच्या बायकोसोबत इंद्र संभोग करून गेला हे कळताच, त्याचा पुत्राला चिरकारीला तिचा वध करण्यास सांगतो. जमदग्नी च्या बायकोने - रेणुकेने फक्त चित्ररथ गंधर्वाकडे सकाम दृष्टीने पहिले तर त्याने लगेच परशुरामाला तिला ठार करण्यास सांगितले.
थोडक्यात, नीतिमत्ता, चाली - रूढी हळहळू बदलत गेल्या. म्हणजेच आज आपल्याला धार्मिक वाटणाऱ्या गोष्टी पूर्वी तश्याच होत्या वा पुढे त्या तश्याच राहतील असं मुळीच नाही.