Bhartiy Udyojika
Bhartiy Udyojika
भारतीय उद्योगविश्वात तळपणाऱ्या महत्त्वाकांक्षी स्त्रियांच्या या संघर्षकथा आपल्याला स्तिमित करतात. भारतासारख्या पुरुषप्रधान देशात स्त्रियांनी कॉर्पोरेट क्षेत्रात अत्युच्च स्थान प्राप्त करणं ही खचितच सोपी गोष्ट नव्हे. अढळ आत्मविश्वास, असामान्य बुद्धिमत्ता, निर्णयकौशल्य यासोबतच स्त्री म्हणून तोंड द्याव्या लागणाऱ्या कौटुंबिक व व्यावसायिक पातळीवरच्या अनंत अडचणींवर मात करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती या गुणांच्या बळावरच या स्त्रियांनी उत्तुंग झेप घेतली. कठोर परिश्रम व बांधिलकीच्या जोरावर त्यांनी खाचखळग्यांनी भरलेला स्पर्धेचा काटेरी मार्ग तुडवला आणि त्या यशोशिखरावर विराजमान झाल्या.
मल्लिका श्रीनिवासन. राजश्री पॅथी. वंदना लूथरा. प्रीथा रेड्डी. अखिला श्रीनिवासन. अनू आगा. डॉ. अमृता पटेल. इंद्रा नूयी. इंदू जैन. एकता कपूर. कल्पना मोरपारिया. किरण मजूमदार शॉ. चंदा कोचर. जरीना मेहता. जिया मोदी. ज्योती नाईक. तर्जनी वकील. नीलम धवन. नैना लाल किदवई. पिया सिंह. प्रिया पॉल. फाल्गुनी नायर. मीरा सान्याल. मेहर पद्मजी. रंजना कुमार. रितू कुमार. रेणुका रामनाथ. रेणू सूद कर्नाड. ललिता डी. गुप्ते. सुधा नारायण मूर्ती.