जागतिक आरोग्य संघटनेने 2003 मध्ये असे जाहीर केले होते की, मृत पावलेल्या 8 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती ही हायपरटेन्शन अर्थात उच्चरक्तदाबामुळे दगावलेली आहे. उच्चरक्तदाब हा छुप्या चोरासारखा असतो. त्याची लक्षणेही आपल्याला चटकण कळत नाहीत.
आजचे स्पर्धात्मक व गतिमान जीवन, स्वत:साठी वेळ न देणे, सदोष आहार आणि व्यायामाचा आभाव यामुळेच उच्चरक्तदाब आणि कमी रक्तदाब या भयंकर आजारांना सामोरे जावे लागते. अनेक वैद्यकीय सर्वेक्षणांतून असे आढळून आले आहे की, जवळजवळ 25 टक्के लोकांना उच्चरक्तदाब हा विकार आहे.
‘ब्लडप्रेशर आणि संपूर्ण उपचार’ या पुस्तकाद्वारे उच्चरक्तदाब आणि कमी रक्तदाब या दोन्ही आजारांना सुयोग्यरीत्या नियंत्रित करण्याविषयीची उपयुक्त माहिती मिळवून तुम्ही गतीने आणि परिणामकारकरीत्या आपल्या रक्तदाबावर नियंत्रण मिळवू शकता. आपल्या रक्तदाबाला चांगल्या पद्धतीने ‘मॅनेज’ करू शकता. योग्य ती काळजी घेतली तर हा ‘क्रॉनिक’ आजार अखंड नियंत्रित राखू शकता.
या पुस्तकात रक्तदाब या आजाराविषयीची शास्त्रीय माहिती सर्वसामान्य व्यक्तींना समजेल अशा सोप्या भाषेत देण्यात आलेली आहे. उच्चरक्तदाब व कमी रक्तदाबाची लक्षणे, रक्तदाबाचा हृदयविकाराशी व इतर आजारांशी असणारा संबंध, रक्तदाब नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण टिप्स आणि रक्तदाबावरील संपूर्ण उपचार याविषयी तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे. एवढेच नव्हे तर हा आजार आपल्याला होऊच नये यासाठी आपली जीवनशैली कशी असावी याबद्दलची शास्त्रीय माहिती या पुस्तकाद्वारे मिळते.
Bloodpressure Ani Sampurna Upchar | ब्लडप्रेशर आणि संपूर्ण उपचार by AUTHOR :- Vidul Suklikar; Alka Pande
Bloodpressure Ani Sampurna Upchar | ब्लडप्रेशर आणि संपूर्ण उपचार by AUTHOR :- Vidul Suklikar; Alka Pande
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
/
per