Business Maharaje By Gita Piramal Translated By Ashok Jain
Business Maharaje By Gita Piramal Translated By Ashok Jain
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 315.00
Unit price
/
per
बहुरंगी `अँबिशस` अंबानी, स्कुटरर्नििमती क्षेत्रात भरधाव प्रगतीचं शिखर गाठणारे राहुल बजाज, एका पाठोपाठ एक कंपन्या काबीज करणारे रमा प्रसाद गोएंका, ज्यांच्या चहाच्या मळ्यांवर ऐश्वर्याचा दरवळ आहे असे बी. एम. खैतान, हि-यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात चमचमणारे भरत व विजय शहा, सतत नवनवे कारखान्यांचे जाळे उभारणारे आदित्य बिर्ला आणि `टॉविंरग` टाटा साम्राज्याला आधुनिक चेहेरा मोहरा देणारे रतन टाटा या आठ विख्यात उद्योगपतींच्या साम्राज्याचा हा शोधक, वेधक, रोचक आलेख. केवळ नफा-तोट्याच्या आकडेवारीनं भरलेला हा ताळेबंद नसून, चैतन्यानं उसळणारी सजीव शब्दचित्रं आहेत. बोर्डरूममध्ये झालेले लढे, झुंजी, संघर्ष, डावपेच, शह, काटशह यांची अंतस्थ माहिती देता-देता या उद्योगपतींनी आपली साम्राज्ये कशी उभारली, त्यांच्या व्यवस्थापनाची गुपिते कोणती, अन्य उद्योगपती जिथे अयशस्वी ठरले तिथे त्यांनी यशाचे गड कसे सर केले, त्याचे एखाद्या कादंबरीहूनही रोमहर्षक, खिळवून टाकणारे वर्णन. परिश्रमपूर्वक संशोधनाची जोड असलेल्या या ग्रंथातील उद्योगपतींच्या कर्तृत्वगाथा स्फूर्तीदायक व विस्मयचकित करून टाकतील.