Cakes By Aparna Arun Parchure
Cakes By Aparna Arun Parchure
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
/
per
परमेश्वराकडे माणसं बनवण्याचा साचा नाही. तो प्रत्येक माणूस वेगळा बनवतो. त्यासाठी तो कशात कायकाय घालतो हे त्यालाच माहीत (देवाच्या बाबतीत ‘देवालाच माहीत` कसं म्हणणार म्हणून) माझ्या बहिणीकडे केक बनवायचा कुठलाही साचा नाहीये. ती प्रत्येक केक वेगळा बनवते. त्यासाठी ती कशात कायकाय घालते ते तिचं तिलाच माहीत (इथे मात्र देवालाही माहीत नसणार, मग ‘देवालाच माहीत’ कसं म्हणणार म्हणून) ती प्रत्येक केक अक्षरश: घडवते. मूर्तिकार एखादी मूर्ती घडवतो, चित्रकार एखादे चित्र चितारतो, मी एखादी भूमिका साकार करतो त्याप्रमाणे ते एक क्रिएशन असतं `A UNIQUE CREATION` आणि मग ती त्यात प्राण ओतते म्हणून तिनं केलेल्या केकच्या म्हातारीच्या बुटाच्या गॅलरीत तुम्हाला हवा खात उभं राहावसं वाटतं, गार्डनच्या केकमध्ये फेरफटका मारावासा वाटतो, कुत्र्याच्या पिल्लाला फिरवून आणावसं वाटतं. केकचं फुलपाखरू तर कधी कापूच नये, असं वाटतं आणि ह्या सगळ्या केक्ससाठी वापरलेले सर्व पदार्थ चक्क खाण्याजोगे असतात. तुम्ही म्हणाल मी माझ्या बहिणीचं जरा जास्तच कौतुक करतोय, पण हे पुस्तक वाचा. त्यानंतर जर तुम्हीही कौतुक केलं नाहीत ना, तर मी माझं नाव बदलून तुम्ही म्हणाल ते ठेवीन, जे सध्या आहे डॉ. गिरीश रत्नाकर ओक. डॉ. गिरीश ओक.