Skip to product information
1 of 1

Chahul Anibanichi By Ashok Jain

Chahul Anibanichi By Ashok Jain

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Condition
Language
कर्तबगार सत्ताधारी स्त्री दुराग्रही आणि तिच्यात दडलेली आई आंधळी झाली म्हणजे जन्माला येते, लोकशाहीचा घास घेऊ पाहाणारी आणीबाणी. २५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींनी या देशावर आणीबाणी लादली आणि घटनाबाह्य सत्ताकेंद्र म्हणून संजय गांधींचे नेतृत्व उदयाला आले. याबद्दलची साधकबाधक चर्चा करणारी अनेक पुस्तके यापूर्वी प्रसिध्द झाली आहेत. पण त्या अनेक ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार असणा-या बी.एन.टंडन या पंतप्रधानांच्या कार्यालयातील संयुक्त सचिवाची ही तत्कालीन दैनंदिनी त्या सर्वांपेक्षा वेगळेपणाने उठून दिसणारी आहे. प्रत्यक्ष आणीबाणी लादली जाण्यापूर्वी आठ महिने ही दैनंदिनी सुरू होते. कोणतेही भाष्य न करता घटनाक्रमच ती अशा रितीने उलगडत जाते की, त्या भीषण नाटकातील विविध पात्रे आपापल्या स्वभाववैशिष्ट्यांसह, गुणदोषांसह जिवंत होऊन आपल्यासमोर उभी राहतात. सत्तासंघर्षाचा खेळ जसजसा रंगत जातो, तसतशी राष्ट्रीय संकटाची जाणीव अधिकाधिक गहिरी होत जाते. ही दैनंदिनी म्हणजे एका ‘जागल्या’ने जनतेच्या दरबारात केलेले अप्रत्यक्ष वृत्तांतकथन आहे. लोकशाही टिकून राहावी, समृध्द व्हावी, असे वाटणा-या प्रत्येक सुजाण नागरिकाने कर्तव्यबुध्दीने वाचावे असे हे लक्षणीय पुस्तक आहे. 
View full details