आपण रोज वाचन करतो, ते आपल्या लक्षात राहिलं आहे असं आपल्याला वाटतं. पण त्यापैकी फक्त काही भागच आपल्या लक्षात राहिलेला असतो. विद्याथ्र्यांनासुद्धा अभ्यासातल्या गोष्टी लक्षात ठेवणं पुष्कळदा कठीण जातं. प्रत्येकाच्या मनात अनेक घटना नोंदलेल्या असतात. पण कालांतरानं त्यातल्या ब-याच पुसट होत जातात. या पुस्तकामुळे वरच्या अडचणी सोडवायला निश्चितच मदत होईल. वाचन आणि लक्षात ठेवणं या गोष्टींसाठी आवश्यक अशी अनेक तंत्र आणि कौशल्यं या पुस्तकात दिली आहेत. आपलं जीवनध्येय साध्य करण्यासाठी अनेकांना त्यांची मदत होईल.