आपल्या इच्छा, आशा, आकांक्षा म्हणजेच सुखाचा शोध. प्रेम, माया, संपत्ती, कीर्ती, सत्ता, आराम इ. ही सारी सुखाची रुपं. पण सुखप्राप्तीचा कुठलाही मार्ग खात्रीशीर नाही. सुख हे मूलत: आपल्या आंतरिक जाणिवेतून निर्माण होतं. फक्त काही सूचना, काही दिशादर्शक तत्वं वापरल्यानं आपला सुखाचा शोध कमी कष्टाचा आणि अधिक सोपा होऊ शकेल. ही तत्वं आणि सूचना आपल्याला ह्या पुस्तकात मिळतील. ह्या अतिशय साध्या आणि सोप्या सूचनांचा स्वीकार करून आपल्या आंतरिक जाणिवेत त्यांना सामिल करून घेतलं तर आपलं सगळं आयुष्यच अधिक सुखमय होऊ शकेल.