वास्तुशास्त्र हे निसर्गाचे नियम आणि माणसाच्या राहण्याचे ठिकाण यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम यांच्या निरीक्षणांवर आधारीत असे प्राचीन शास्त्र आहे. इमारतींच्या रचनांमध्ये पंचमहातत्त्वांना योग्य ते स्थान देऊन निसर्गातील अज्ञात आणि अनंत शक्तींबरोबर संवाद साधण्यासाठी तसेच पर्यावरणाशी साहचर्य प्रस्थापित करण्यास वास्तुशास्त्राची मदत होते.