फंडेबाजी कोणालाही आवडत नाही. पण ही फंडेबाजी तुम्हाला निश्चितपणे आवडेल. ही जरा वेगळी आहे. हे चार फंडे तुमचं आयुष्य समृद्ध बनवतील, मजेदार बनवतील. रोजचं जगणं अतिशय सोपं आणि तणावरहित असेल. प्रत्येक फंडा वाचताना तुमच्या जीवनातलं ओझं कमी झाल्यासारखं तुम्हाला वाटेल आणि जेव्हा चौथा फंडा वाचून होईल तेव्हा तर तुम्हाला एकदम हलकं हलकं वाटेल. तुमचं वजन शून्य झालेलं आहे असं वाटेल. संपूर्ण पुस्तक व्यावहारिक जीवनावर, प्रत्यक्ष अनुभवांवर आधारलेलं आहे. तुम्हाला नुसतेच आवडणार नाही, तर तुमचे परिवर्तन होईल.