1
/
of
1
Chase Your Dreams By Sachin Tendulkar Translated By Deepak Kulkarni चेस युअर ड्रीम्स
Chase Your Dreams By Sachin Tendulkar Translated By Deepak Kulkarni चेस युअर ड्रीम्स
Regular price
Rs. 265.00
Regular price
Rs. 295.00
Sale price
Rs. 265.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
अवघ्या अकराव्या वर्षी सचिनच्या क्रिकेटची सुरुवात झाली तेव्हा त्याला तरी कुठे माहीत होतं, की पुढील २४ वर्षं २२ यार्डांच्या खेळपट्टीशी आपलं नातं जोडलं जाणार आहे. ‘प्लेइंग इट माय वे’ या सचिनच्या आत्मचरित्राची (क्रिकेटचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या) तरुणांसाठीची आवृत्ती असंच ‘चेस युअर ड्रीम्स’या छोट्या आत्मचरित्राचं स्वरूप आहे. या छोट्या चरित्रातून सचिन आपली अवघी कारकीर्द... आपला अवघा जीवनपट वाचकांपुढे मांडतो. ‘प्लेइंग इट...’मधून दिसणारा सचिन या पुस्तकातूनही तितकाच उत्कटपणे दिसतो. सुरुवातीच्या काळी इतर देशांची काहीशी कुाQत्सत धारणा होती, की भारतीय संघ जलदगती गोलंदाजीपुढे नांगी टाकतो... बचावात्मक खेळतो. अजित वाडेकरच्या नेतृत्वाखालील संघाने विंडीजला त्यांच्याच मातीत धूळ चारत चमत्कारसदृश विजय मिळवले. लिटिल मास्टर सुनील गावसकरने आपल्या तंत्रशुद्ध सरळ बॅटच्या फलंदाजीने तेज बोलर्सना निष्प्रभ करीत भारतीय संघाची प्रतिमा उजळवली. गावसकरची हीच शास्त्रशुद्ध फलंदाजी सचिनसाठी प्रेरणा होती. सीमारेषा खुणावत असली तरी चांगल्या चेंडूला मान देत त्याने आपल्या नैसर्गिक फटकेबाजीला मुरड घातली. चकवणाऱ्या चेंडूना बॅकफूटवर जात सीमारेषा दाखवण्याची त्याची शैली प्रक्षणीय असायची. स्ट्रेट ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह, फ्लिक, हुक, रिव्हर्स स्वीप अशी सर्व अस्त्रं त्याच्या भात्यात होती.
Share
