Chatrapati Shivaji Maharaj Kal Ani Kartrutva by jadunath Sarkar छत्रपती शिवाजी महाराज काळ आणि कर्तृत्व जदुनाथ सरकार
Chatrapati Shivaji Maharaj Kal Ani Kartrutva by jadunath Sarkar छत्रपती शिवाजी महाराज काळ आणि कर्तृत्व जदुनाथ सरकार
छत्रपती शिवाजी महाराज काळ आणि कर्तृत्व जदुनाथ सरकार
एक 'इतिहासकार' म्हणून जदुनाथ सरकार (१८७०-१९५८) हे "स्वतः च अभ्यासाचा विषय आहेत. त्यांच्या अभिजात इंग्रजी लेखनातून साकारलेली पाचवी सुधारित आवृत्ती 'भारतीय इतिहास आणि समाज' या विषयाचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची आणि संशोधकांची मागणी पूर्ण करते.
शिवाजी अँड हिज टाइम्स या इंग्रजी पुस्तकात या महान मराठा राजाचं चरित्र आहेच, शिवाय त्यात आणखीही बरीच माहिती आणि अनेक गोष्टींची चर्चा करण्यात आली आहे. याआधी या पुस्तकाच्या आधीच्या आवृत्त्यांचा आधार घेऊन काही पुस्तकं लिहिली गेली असली, तरी जदुनाथ सरकार यांच्या या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचा हा 'पहिला'च मराठी अनुवाद आहे. त्यात सतराव्या शतकातील दख्खनच्या इतिहासाच्या गुंतागुंतीच्या जाळ्याचे धागे उकलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसंच शिवाजीराजांच्या मुघलांशी असलेल्या संबंधांच्या उत्कंठावर्धक वर्णनाबरोबरच मुघल सल्तनतीच्या पाडावाच्या काळातील अंतर्गत गोष्टींची तपशीलवार माहितीही समजते. या पुस्तकात राजांचे इंग्रजांशी आणि पोर्तुगीजांशी कसे संबंध होते, त्याचं विश्लेषणही करण्यात आलं आहे. सतराव्या शतकातील मराठा प्रशासन, राज्य यंत्रणा व धोरण यांचा ऊहापोह करून आणि शिवाजीराजांच्या कामगिरी, यश, त्यांचं चारित्र्य आणि इतिहासातील स्थान यांचा आढावा घेऊन या पुस्तकाची सांगता होते.