Chhatrapati Shivaji Maharaj(Paper Back) by K A Keluskar. छत्रपती शिवाजी महाराज कृ अ केळुस्कर
Chhatrapati Shivaji Maharaj(Paper Back) by K A Keluskar. छत्रपती शिवाजी महाराज कृ अ केळुस्कर
1907 साली लिहिलं गेलेलं सर्वात पहिलं 'शिवचरित्र', ते ही अस्सल संदर्भासहित....
कृ अ केळुस्कर लिखित, छत्रपती शिवाजी महाराज चरित्र आपल्यासाठी उपलब्ध करत आहोत. शिवरायांचे चरित्र लिहिण्यासाठी त्यांनी चार पाच वर्षे कर्ज घेऊन संशोधन केले. शिवचरित्र लिहून झाल्यावर काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी पुस्तकाला प्रचंड विरोध देखील केला.. अक्षरशः केळुसकर गुरुजींवर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली होती तरीसुद्धा हे पुस्तक त्यावेळी प्रसिद्ध झाले आणि आताही उपलब्ध आहे.
या शिवचरित्रातील शेवटचे भाग गुणदोषविवेचन आणि प्रकृतचरित्रापासून बोध हे मात्र आजच्या शिवप्रेमींसाठी अत्यंत महत्वाचे ठरतात. यातून शिवरायांवरील अनेक आरोपांचे खंडन सरांनी केलेले आहेच, सोबत आजच्या पिढीने शिवचरित्रातून काय घ्यावे, याचेदेखील धडे लेखक आपल्याला देतात.
1907 साली हे चरित्र लिहिलं असल्याने याची मांडणी आणि भाषा समजण्यास थोडी जड जाऊ शकते पण यात मांडलेले संदर्भ कोणीही नाकारू शकत नाही. केळुस्कर यांनी केलेली मांडणी आणि अभ्यास, संशोधन हे जास्त करून समकालीन बखरींवर आधारित आहे. यामध्ये कसल्याही प्रकारची अतिशयोक्ती किंवा इतर कादंबरीकारांसारखे रंगवून लिहिलेलं नाही. जे आहे ते आहे अस..