बहिणी-बहिणींच्या नात्यातला हा भावबंध त्यातल्या वात्रट, रांगड्या, बोचनाऱ्या आणि प्रेरकछटांसह. तुमच्या त्या झिपऱ्या केसांचे दिवस अन्लांब सडक केसांचे दिवस तिनं पाहिलेले असतात आणि अगदी तुमची पहिली रुपेरी बट ही तिच्या परिचयाची असते. तीच तर असते, पहिली स्वस्तातली ब्रा विकत घेऊन देणारी तुमची सल्लागार. त्यानंतर मग तुमचा लग्नाचा पोषाख आणि बाळंतपणानंतरची जीन्स खरेदी करतानाची मार्गदर्शक ती तुमची बहीण असते, मैत्रीण असते, तुमचा विश्वास असते. तुमच्या आयुष्यात ती जे जे काही घेऊन येते, त्या सर्वांची मजा, ‘चिकन सूप फॉर द सिस्टर्स सोल’च्या ह्या दुसऱ्या भागात अनुभवा. हृदयस्पर्शी प्रेरणादायक आणि हास्य स्फोटक गोष्टींचा हा संग्रह तुमच्या त्या रम्य दिवसांचे स्मरण करून देईल. काळजाला भिडणाऱ्या ह्या कहाण्या तिनं तुम्हाला तुमच्या खडतर काळात कसा आधार दिला, यावरही प्रकाश टाकतील. आठवणीत ठेवावी अशीही साठवण तुमच्या हृदयाला स्पर्शून जाईल; थेट तुमच्या बहिणीसारखीच!