1
/
of
1
Chicken Soup for the Soul: True Love Part 2
Chicken Soup for the Soul: True Love Part 2
Regular price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Sale price
Rs. 216.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
‘प्रेम’ ही एक उदात्त भावना आहे. आई-वडील-मुलं, मित्र-मैत्रिणी, भावंडं यांच्यातील प्रेम अशी प्रेमाची अनेक रूपं असतात; पण नवरा-बायको यांच्या नात्याला आणखी एक पदर असतो तो म्हणजे प्रणयाचा. शारीर आणि आत्मिक अशा दोन्ही पातळ्यांवरचं हे प्रेम असतं. तर नवरा-बायकोमधील प्रेमाची विविध रूपं ‘चिकनसूप फॉर द सोल -ट्रू लव्ह’ मध्ये अधोरेखित केली आहेत. प्राधान्याने विवाहोत्तर टप्प्यावरच्या या कथा आहेत. विवाहानंतरचे बदल स्वीकारताना कराव्या लागणा-या तडजोडी ‘प्रेम सदाबहार ठेवताना’ या विभागात चितारल्या आहेत. ‘खNया प्रेमाचे शिकलेले धडे’ या विभागात छोट्या छोट्या गोष्टींतूनही परस्परांवरचे प्रेम दर्शवता येते, हे अधोरेखित करणाNया कथा आहेत. तर ‘सदासर्वदा हसत राहा’ या विभागात लग्नावरचं खुसखुशीत भाष्य आहे. ‘मनापासून दिलेल्या भेटवस्तू’ या विभागात उत्कट प्रेमाची साक्ष असलेली भेट पत्नीला देणाNया पतीच्या कथा आहेत. त्यात लग्नाच्या बाविसाव्या वाढदिवशी पत्नीला बावीस कवितांची भेट देणारा पती आहे, तर आपला अंत जवळ आलेला असताना बायकोला कुत्र्याचं पिल्लू भेट देणारा वॅÂन्सरग्रस्त पतीही आहे. ‘चिरकाल टिकणारं प्रेम’ या विभागातील कथा फारच हृदयस्पर्शी आहेत. पती विंÂवा पत्नी मृत्यूच्या वाटेवर असताना विंÂवा दोघंही शारीरिकदृष्ट्या विकलांग असताना विंÂवा दोघांपैकी एक शारीरिकदृष्ट्या परावलंबी असतानाही दोघांमधील प्रेमाचा असलेला अतूट बंध, परस्परांविषयीचा पराकोटीचा जिव्हाळा आणि शरीरापलीकडे पोहोचलेलं परिपक्व प्रेम याचं हृद्य दर्शन घडविणाNया या कथा आहेत.
Share
