Chimbore Yudh by Balasaheb Labhade चिंबोरेयुध्द बाळासाहेब लबडे
Chimbore Yudh by Balasaheb Labhade चिंबोरेयुध्द बाळासाहेब लबडे
Couldn't load pickup availability
"चिंबोरेयुद्ध" म्हणजे उत्तरआधुनिक कादंबरी अंतर्गत एक अभिनव, अभिजात कादंबरी प्रकार आहे ज्याला अ-कादंबरी म्हणता येईल. साहित्यांतील सारे सिद्धांत, याद, 'इजम्स' धाव्यावर बसवत 'अॅब्सडिटी' संज्ञेला नजिक जाऊ पहाणारी ही संहिता म्हणजे चिंबोऱ्यांच्या मुखातून वर्तमान स्थितीवरील विशिष्ट शैलीतून केलेले ब्लॅक सटायर आहे.'ज्याच्याकडे बंदा त्याचा नाही वांदा' असे म्हणत उजेडात विरोध व अंधारात दिलजमाई करत सत्ता आहे तोवर हात धुऊन घेणाऱ्या व सत्तेगणिक निष्ठा बदलणाऱ्या चिंबोरीवृत्तीच्या माणसांची ही कथा आहे. म्हणजेच शासन व शोषण, नमन व दमन ही नीती स्वीकारलेल्यांची कथा आहे. ह्या दोन्हीवृत्तीच्यांनी लोकशाहीच्या नावावर छुपी भांडवलशाहीच निर्माण केली आहे. जिथे पोषणकर्तेच शोषणकर्ते आहेत. इथे थिंकटँकवाले चिंबोरे किंगमेकर बनून जोमात वावरतात तर काही सत्तेत अथवा विरोधात न रहाता 'वेट अॅण्ड वॉच' ची भूमिका घेऊन संधीची वाट पहातात. बहुसंख्याकांना भावनिक मुद्द्यांमध्ये गुंतवत मूळ विषयांना बगल देण्यात काही मन असतात तर काही आश्वासनांची खैरात करत मनोरंजन करणाऱ्या वावड्या उठवताना दिसतात. काही शहाणे तिव्र राष्ट्रभक्तीतून गुलाम निर्माण करायचे ते तंत्र विकसित करतात व ज्यांना कोणतीच लायकी नाही ते सगळ्या समित्यांतून घुसताना दिसतात. मार्क्सवाद, आणिबाणी, जागतिकीकरण, सोशल मिडिया, निवडणुकांचं संख्याशास्त्र, आंतरराष्ट्रीय पुंजीवाद, ह्यांचा खल होतानाच आधुनिक युद्धतंत्र, सायवरहल्ले व रासायनिक युद्धसामुग्रीसह रोगजंतू शरिरात घुसडण्याच्या कारस्थानावरही उहापोह इथे होताना दिसतो. चिंबोरवाडीतील चिंबोऱ्यांचे राजकारण, चिंबोरजनतेला संभ्रमावस्थेत ढकलून, शोषणाचे नवे आयाम निर्माण करत, सतत सत्तेवर राहण्यासाठी, महायुद्धाची चिंबोरघाई त्यांच्यावर लादत तर नाही ना? असा प्रश्न ही कादंबरी निर्माण करते.