Skip to product information
1 of 1

Daryavardi Kolambas By: Aarmstrong Spery

Daryavardi Kolambas By: Aarmstrong Spery

Regular price Rs. 252.00
Regular price Rs. 280.00 Sale price Rs. 252.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

कोलंबसने भावनावेगानेच आपले डोके झुकविले आणि तो शांत स्वरात म्हणाला, “दिगो, बेटा, मी फार थोर आहे; पण मला मात्र आयुष्यभर तसं कधी वाटलं नाही. सारी हयातभर मी परिस्थितीशी झगडलो, लोकांच्याकडून शिव्याशाप खाल्ले. उद्देश फक्त एकच होता की, उद्याच्या इतिहासाचं, मानवी भवितव्याचं कुठलं तरी नवं दार उघडलं जावं... हे पाहा... इकडे पाहा... सारं आकाश पुन्हा प्रकाशानं उजळलेलं दिसत आहे. वादळ संपत आलं. लवकरच सूर्योदयाची सोनेरी किरणं क्षितिजावर उगवतील. पुन्हा एक नवा तेजस्वी दिवस या इथे उजाडेल..."

नकळतच दिगोचे पाय बाजूच्या खिडकीकडे वळले. समोरच्या आकाशात सोनेरी प्रकाशाचा एक तेजस्वी पट्टा झळाळत होता. त्या सोनेरी तेजस्वी प्रकाशाचे एक टोक दूरवर, फार दूरवर कुठल्यातरी अज्ञात भूप्रदेशावर टेकलेले दिसत होते. होय, एका अज्ञात जगाकडे चढून जाण्यासाठीच जणू काय ती सोनेरी प्रकाशाची शिडी लावलेली आहे असे क्षणभर त्याला वाटले.... दिगोच्या डोळ्यांपुढे काहीतरी अघटित घडत होते. जे घडत होते ते इतके महान आणि विस्मयकारक होते की, त्याच्यावर कुणाचाही विश्वास बसू शकला नसता...

दिगो उभा होता. आणि त्याच्या मागच्या बाजूला एका हाताच्या अंतरावर त्याचे वडील-वृद्ध आणि जीर्ण, थकलेले आणि विरघळणारे दिवस मोजीत बसलेले होते. त्यांचा आत्मा ती सोनेरी शिडी चढून कुठल्यातरी अज्ञात जगाचा शोध घेण्यासाठी उत्कंठित झालेला दिसत होता. वाट चुकलेल्या आणि वादळवाऱ्याने भंगलेल्या गलबताला मार्गदर्शन करण्यासाठीच की काय, त्या समोरच्या क्षितिजावर एक तेजस्वी तारा लुकलुकत होता....

 

View full details