Doglapan, दोगलापन, Ashneer Grover
Doglapan, दोगलापन, Ashneer Grover
माझ्या आयुष्यात नायक, खलनायक, चरित्र कलाकार आणि अशा बऱ्याच जणांचा वाटा आहे. ही माझी खरी जीवन कहाणी आहे, जिने मला अनुभवसमृद्ध केले, अकाली पांढरे केस दिले, माझे खरे मित्र आणि हितचिंतक कोण याबद्दल सावध केले आहे; अपयशात यश आणि यशात अपयश यांचे 'दोगलापन' याविषयी बरेच काही शिकवले आहे; त्याचबरोबर जीवनात खरोखर काय महत्त्वाचे आहे याची सखोल समज दिली; आणि हे सांगण्याची खरं तर गरज नाही, पण जीवनाने अनपेक्षितरीत्या भिरकावलेल्या अनेक चक्रावून टाकणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाण्याची पुरेशी संधी दिली.
- अश्नीर ग्रोव्हर
दिल्लीच्या मालवीयनगरमध्ये वाढलेला, 'निर्वासित' म्हणून संबोधला गेलेला एक तरुण शैक्षणिक उत्कृष्टतेच्या शिखरावर असणाऱ्या भारतातील आयआयटी दिल्लीमध्ये रँक - होल्डर बनून परिस्थितीवर मात करतो. आयआयएम अहमदाबादच्या अत्यंत आदरणीय संस्थेमधून एमबीए केल्यावर एमएक्स, कोटक इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये गुंतवणूक बँकर म्हणून तो करिअर घडवतो आणि ग्रोफर्सचा सीईओ तसेच भारतपेचा संस्थापक म्हणून या दोन कंपन्यांना युनिकॉर्न बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
अश्नीर यांच्या आयुष्यात उलथापालथ होत असतानाही शार्क टँक इंडिया या लोकप्रिय टीव्ही शोमधील एक परीक्षक या नात्याने त्यांचे नाव घराघरात पोहोचले आहे. विवाद, मीडिया स्पॉटलाइट, सोशल मीडियावरील वाचाळवीरांमुळे काल्पनिक गोष्टींपासून सत्य वेगळे करणे कठीण असते.
स्टार्टअप इंडियाचा आवडता आणि गैरसमज झालेला पोस्टर बॉय अश्नीर ग्रोवर यांची ही नि:संदिग्ध कथा आहे. निर्मळ प्रामाणिकपणाने आणि अतिशय मनापासून सांगितलेल्या कथेचा हा उत्कृष्ट नमुना आहे.