Domel Te Kargil By Shashikant Pitre
Domel Te Kargil By Shashikant Pitre
Regular price
Rs. 383.00
Regular price
Rs. 425.00
Sale price
Rs. 383.00
Unit price
/
per
रणरंगात न्हालेल्या धगधगत्या नंदनवनाची क्षात्रधर्मी कथा१९४७ साली भारतात जसे स्वातंत्र्याचे वरदान लाभले, तसाच विभाजनाचाशापही मिळाला. त्या शापाची बोच कमी होती म्हणून की काय, नवोदितपाकिस्तानने जम्मूकाश्मीर बळकावण्याचा खुनशी डाव आखून भारताला सशस्त्रसंघर्षात खेचले. त्या सीमावर्ती संस्थानाने अगतिक होऊन स्वसंरक्षणार्थ भारताकडेधाव घेतली. विलीनीकरणाची संवैधानिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर भारताने आक्रमकांनामागे रेटण्यासाठी लष्करी मोहीम आरंभली. ती अंशतः यशस्वी झालेली असतानाचयुध्बंदी करार झाला. ते युध्द थांबले, पण संघर्ष शमला नाही. तो जीवघेणासंघर्ष आजतागायत चालूच आहे, त्याचे स्वरूप बदलले आहे, विस्तारले आहे.दोन्ही देशांच्या अस्तित्वाचा तात्त्विक मूलाधार ठरलेल्या जम्मू-काश्मीरच्या भूमीवरचार युध्दे खेळली जाऊनही खरीखुरी शांतता दृष्टिपथातही येऊ शकलेली नाही.पाकिस्तानने पुकारलेल्या परभारी युध्दाचा रंगही बदलत, अधिक गडदगहिरा होतचालला आहे. दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या या समस्येचा अत्यंत मूलगामीवेध घेणारा ग्रंथ म्हणजेच ‘डोमेल ते कारगिल’ !पाकिस्तानने फंदफितुरीने डोमेल ही पहिली सीमावर्ती चौकी बळकावली, तेव्हापासूनसुरू झालेल्या आणि भारतीय सेनादलांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पाकघुसखोरांपासून कारगिलचा टापू मुक्त केला, तोपर्यंत(किंबहुना त्यानंतरही)चालूच राहिलेल्या एका रौद्रभीषण संघर्षाची ही रोमांचक कथा आहे. इतिहासघडवणा-या भूगोलाचे, रणांगणावरच्या लहानमोठ्या मोहिमांचे, उभय पक्षांच्याव्यूहरचनेतल्या डाव-प्रतिडावांचे, प्रतिकूल निसर्गावर मात करणा-या जिद्दी सैनिकांच्याबलिदानी पराक्रमाचे तपशीलवार विवेचन हे तर या ग्रंथाचे ठळक वैशिष्टयआहेच; पण प्रतिशोधाच्या भावनेने पेटून उठलेल्या पाकिस्तानने गेली दहा-बारावर्षे जे परभारी युध्द पुकारले आहे, त्याचे मर्मभेदी विश्लेषण हेसुध्दा या ग्रंथाचेतितकेच महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. नंदनवनातील राजकीय-सामाजिक परिस्थितीचे,तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजनैतिक हालचालींचे बदलते रंगही नेमकेपणानेटिपणारा हा ग्रंथ काश्मीर समस्येबद्दलचे सर्व वाचकांचे आकलन समृध्द करील,यात शंकाच नाही.सूर्यकुलाचा दिव्य वारसा सांगणा-या लढवय्या लेखकाचा हा पहिलाच ग्रंथयुध्दविषयक मराठी साहित्याचे दालन समृध्द करणारा ठरावा, अशाच तोलामोलाचाआहे.