DURGAJIDNYASA SATARA JILYATIL KILLYANCHI BY PRADIP PATIL दुर्गजिज्ञासा सातारा जिल्यातील किल्ल्यांची प्रदीप पाटील
DURGAJIDNYASA SATARA JILYATIL KILLYANCHI BY PRADIP PATIL दुर्गजिज्ञासा सातारा जिल्यातील किल्ल्यांची प्रदीप पाटील
DURGAJIDNYASA SATARA JILYATIL KILLYANCHI BY PRADIP PATIL दुर्गजिज्ञासा सातारा जिल्यातील किल्ल्यांची प्रदीप पाटील
“दुर्गजिज्ञासा” मांडताना मला तब्बल नऊ वर्षांचा कालावधी लागला. हा ग्रंथ ऐकिव भाकड़कथांवर आधारलेला नसावा, त्यातल्या प्रत्येक वाक्याला संदर्भाची उत्तम जोड दिलेली असावी, सातारा जिल्ह्याच्या दुर्गमाळेत हा ग्रंथदुर्ग त्याच तेजाने उडून दिसावा म्हणून माझा अटोकाट प्रयत्न होता.
सह्याद्रीच्या मस्तकावर उभे असलेले अनेक गडकिल्ले उन्ह, वारा, पाऊस यांच्याशी निकराचा लढा देत आजमितीस तग धरून आहेत. ऐतिहासिक सातारा जिल्ह्यातील दुर्गसंपदाही अशीच इतिहासाला कुशीत घेऊन बसलेली. वादळ-वार्याला तोंड देत पडत झडत का होईना पण आजही या गडकोटांचे तट-बुरूज खंबीरपणे उभे आहेत. हे गडकोट इतिहासकारांना इतिहासाच्या मुळाशी जात मांडण्याचा आग्रह करत आहेत. ग्रंथ, बखरी,पत्रे यातून त्यांच्या अस्तित्वाच्या लिखित खुणा शोधायची आर्त हाक देत आहेत. स्थापत्यविशारदांच्या कल्पनेतून उभ्या राहिलेल्या दुर्गांच वैभव कालपटलावर त्यांच्या भव्यतेची सतत जाणिव करून देत राहिल.
दुर्गजिज्ञासाची पायाभरणी झाली ती हीच साद ध्यानी मनी ठेवून.सर्वात महत्वाचे कालपटावर नामसंचिर्तन करावयाची अनाम इच्छा असलेल्या कोणत्याही मनुष्याने वृक्ष-वेलींप्रमाणे नवनव्या उन्मेषाने सदैव फुलत राहायला हवं, अदम्य जिज्ञासेच्या बळावर आपल्या ज्ञानकक्षांचा परिघ वाढता ठेवायला हवा हा मूलभूत सिध्दांत ग्रंथ साकारताना मला अत्यंत उपयोगी ठरला.
ग्रंथात संदर्भसाधनांतून केलेली मांडणी , सध्यस्थितीतील वास्तूंची रेखाटने , नकाशे तसेच वास्तूंची सध्यस्थिती यातून तयार झालेला दस्तावेज पुढच्या काळात मौल्यवान ठरेल हे अगदी मी ठामपणे सांगू शकतो.
वादळात सापडलेली नौका किनार्यावरील दिपगृहाच्या मिणमिणत्या प्रकाशाच्या सहाय्याने किनारा गाठू शकते अगदी त्याच न्यायाने दुर्गजिज्ञासा ग्रंथाची नौका इतिहासाच्या पानांवर पसरलेल्या असंख्य संदर्भरूपी प्रकाश शलाकांना शोधत पूर्णत्वाच्या काठावर पोहोचली आहे असे मला वाटते. इतिहासाच्या समृद्ध सागरातील ही ग्रंथनौका संदर्भ साधनांनी काठोकाठ भरली आहे हा एक लेखक या नात्याने मी नक्कीच विश्वास देतो.
या प्रवासा दरम्यान अनेकांचे सहकार्य लाभले, आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने हा प्रवास पुर्णत्वास जातोय.आपल्या सर्वांचा मी नेहमी कृतज्ञ राहीन.